Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > World Stroke Day : सतत टेंशनमध्ये असता? रोजच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो ब्रेन स्टोक; वेळीच सावध व्हा

World Stroke Day : सतत टेंशनमध्ये असता? रोजच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो ब्रेन स्टोक; वेळीच सावध व्हा

World Stroke Day : आरोग्य तज्ञांच्या मते, मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यामुळे मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत, त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:44 AM2021-10-29T11:44:14+5:302021-10-29T12:19:06+5:30

World Stroke Day : आरोग्य तज्ञांच्या मते, मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यामुळे मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत, त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

World Stroke Day : Risk factors of brain stroke know how to prevent it | World Stroke Day : सतत टेंशनमध्ये असता? रोजच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो ब्रेन स्टोक; वेळीच सावध व्हा

World Stroke Day : सतत टेंशनमध्ये असता? रोजच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला होऊ शकतो ब्रेन स्टोक; वेळीच सावध व्हा

जीवनशैलीतील ताण तणावामुळे आपल्या आरोग्याला गंभीर समस्या उद्भवू शकतात. ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) ही देखील अशीच एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्याचा धोका सतत वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रेन स्ट्रोकचे सर्वाधिक बळी तरुण आहेत, ही देखील चिंतेची बाब आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की जीवनशैलीच्या काही सवयी वेळेत सुधारल्या तर ब्रेन स्ट्रोकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो. 

आरोग्य तज्ञांच्या मते, मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित किंवा कमी झाल्यामुळे मेंदूच्या ऊतींना ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाहीत, त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरायला लागतात. तज्ञांच्या मते, ब्रेन स्ट्रोक ही एक आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाला त्वरित उपचारांची आवश्यकता असते. हे वेळीच कळले तर परिस्थिती गंभीर होण्यापासून वाचू शकते.

धूम्रपानासह इतर अनेक प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार तसेच ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जॉन्स हॉपकिन्स मेडिसिनचे तज्ज्ञ म्हणतात की धूम्रपानामुळे इस्केमिक स्ट्रोकचा धोका दुप्पट होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर बंद करून स्ट्रोकचा धोका कमी करता येतो. याशिवाय जास्त मद्यपान करणाऱ्यांनाही स्ट्रोकचा धोका असतो.

शारीरिक हालचालींचा अभाव

व्यायामामुळे तुमची हृदय गती वाढते, घाम येतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. व्यायाम तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यास मदत करतो. तथापि, अनेक कारणांमुळे लोकांमध्ये शारीरिक निष्क्रियता वाढत आहे, ज्यामुळे स्ट्रोक आणि इतर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवून, तुम्ही स्ट्रोकचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करू शकता.

ब्रेन स्टोकपासून सुरक्षित कसं राहाल? (Preventions of brain stroke) 

ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी, धूम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर राहून आपल्या जीवनशैलीत नियमित व्यायामाचा समावेश करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे जॉन हॉपकिन्समधील तज्ज्ञ म्हणतात. याशिवाय, संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्यास रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते, जे ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेताना महिलांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title: World Stroke Day : Risk factors of brain stroke know how to prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.