दरवर्षी १ नोव्हेंबरला वर्ल्ड वेनग डे (World Vegan Day) साजरा केला जातो. वेगन डाएटमध्ये मांस, डेअरी उत्पादनं आणि अंड्यांसारखे पदार्थ अजिबात नसतात. प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सचा हा एक उत्तम सोर्स आहे. वेगन फूड्समधून तुम्हाला बरीच पोषक तत्व मिळतात. (Vegan Diet kay aste)
व्हेगन फूड १०० टक्के शुद्ध शाकाराही ठरते. अनेक बॉलिवडू सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध खेळाडूसुद्धा वेगन डाएटकडे वळाले आहेत. हा आहार घेऊन तुम्ही बॅलेन्स डाएट मेटेंन करू शकता. यामुळे प्रोटीन्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्सची कमतरता रोखण्यास मदत होते. (World Vegan Day Include These Vegan Food to get protein Vitamin B-12 Vitamin D by experts)
१० पौष्टीक वेगन पदार्थ कोणते?
चिया सिड्स, शेंगदाणे, फोर्टिफाईड मिल्क, बदाम, कडधान्ये, हिरव्या भाज्या, भात, सोया मिल्क, टोफू, ब्रोकोली.
भाजी करताना रस्सा थोडा घट्ट होण्यासाठी काय करायचं? ५ टिप्स-हॉटेलसारख्या भाज्या होतील घरी
व्हेगन डाएट का गरजेचं?
डॉक्टर सांगतात की एनर्जी, मसल्स आणि हार्मोनल बॅलेन्ससाठी प्रोटीन्स गरजेचे असतात. यात डाळी, टोफू, टेम्पेह अक्रोड, इतर बीयायुक्त पदार्थ, अन्नधान्य, प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर, भाज्या यांचा समावेश आहे. हे पदार्थ शुद्ध शाकाहारी आणि व्हेगन असून फायबर्स, आयर्न, हेल्दी फॅट्स यांसारखी पोषक तत्व यातून मिळतात.
वेगन डाएटचे फायदे
वेगन डाएटमधून शरीराला आवश्यक असणारे घटक मिळतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. व्हिटामी बी-१२, व्हिटामीन डी, व्हिटामीन सी, व्हिटामीन ए या पदार्थांचा यात समावेश आहे. व्हिटामीन ए, व्हिटामीन ई, फॉलेट, व्हिटामीन के शरीराच्या चांगल्या कार्यासाठी गरजेचे असतात. प्लांट बेस्ड दूध, ब्रेकफास्ट सिरियल्स, संत्र्याचा रस, सीट्रस फ्रुट, स्ट्रोबेरी, किव्ही, गाजर, शकरकंद, फॉर्टिफाईड फूड, पालक, केल, कोलार्ड यांचा समावेश आहे.
तरूणपणातच गुडघे, कंबर दुखणं वाढलं? रोज सकाळी १ लाडू खा-कॅल्शियम, प्रोटीन भरपूर मिळेल
अनेक असे पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरासाठी आवश्यक असणारे घटक मिळवू शकता. डाळी, टोफू, शेंगदाणे पालक, केल, टोफू, आयोडाज्ड मीठ, मॅग्नेशियम, हार्क चॉकलेट, बदाम, ब्राऊन राईस, क्विनोसा हे उत्तम पर्याय आहेत. वेगन डाएट अनेक प्रकारचे प्रोटीन्स,व्हिटामीन्स आणि मिनरल्स देऊ शते. जे संपूर्ण शरीराला निरोगी ठेवतात. या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला पोषक तत्व मिळतील.
वेगन डाएटमध्ये तुम्ही काय खाऊ शकत नाही
वेगन डाएट हे पूर्णपणे प्लांटबेस्ड फूड असल्यामुळे यात नॉनव्हेज, मासे, अंडी-इतर पोल्ट्री उत्पादनं खाता येत नाही, चिझ, बटर, दूध, क्रिम, आईस्क्रीम इतर डेअर प्रोडक्ट्स, मायोनिज, मध.