Join us   

आता 'क्लायमेट चेंज' नावाचा गंभीर आजार, कॅनडात महिलेला श्वास घ्यायला गंभीर त्रास झाला आणि..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:54 AM

World’s first patient of climate change : ग्लासगो येथे सुरू असलेल्या COP26 शिखर परिषदेत सार्वजनिक आरोग्य आणि जलवायू समस्या यांच्यातील संबंध हा एक गंभीर विषय बनला आहे

वातारवणात बदल झाल्यावर अनेकांना सर्दी, खोकल्यासह श्वासाशी संबंधित आजार उद्भवतात. सामान्य समजून या त्रासाकडे दुर्लक्ष केलं जातं. कॅनडाच्या (Canada) ब्रिटिश कोलंबिया (British Columbia) प्रांतात एका डॉक्टरने हवामान बदलामुळे त्रस्त असलेल्या रुग्णाचा शोध लावला आहे. या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. कॅनडा टाइम्स कॉलोनिस्टने वृत्त दिले आहे की कूटनेसमध्ये अलीकडेच जंगलात लागलेल्या आगीनंतर रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. बीसी वाइल्डफायर सर्व्हिस वेबसाइटनुसार, या आर्थिक वर्षात ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील कूटनेस भागात 1,600 हून अधिक जंगलात आग लागली. (World’s first patient of climate change)

कूटनेस रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्ष (ER) विभागाचे प्रमुख डॉ. काइल मेरिट यांनी अनेक प्रकरणे पाहिली आहेत जिथे उष्णतेमुळे मधुमेह, हार्ट फेल्यूर आणि यासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. तथापि, मृत्यू किंवा गंभीर आजार यांचा उष्णतेच्या लाटा किंवा वायू प्रदूषणाशी संबंध जोडण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉ मेरिट यांनी ही माहिती प्रिन्स जॉर्ज, कमलूप्स, व्हँकुव्हर आणि व्हिक्टोरियाच्या शेजारील प्रांतातील इतर डॉक्टरांना दिली आहे. जूनपासून कॅनडातील उष्णतेचा विक्रम मोडणाऱ्या उष्णतेच्या लाटेत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. लिटन, ब्रिटिश कोलंबिया येथे २९ जून रोजी तापमान ४९.६ डिग्री सेल्सियसवर पोहोचले.

रुग्णांमध्ये कोणती लक्षणं जाणवतात?

काही रुग्ण दम्याच्या समस्येने त्रस्त आहे. डॉ मेरिट यांनी सांगितले की, या उन्हाळ्यात ७० वर्षीय महिला उष्णतेच्या लाटेची शिकार झाली. त्यामुळे तिची प्रकृती खूपच बिघडली. तिला मधुमेह असून हृदयाशी संबंधित आजारही आहेत. ती वातानुकूलित नसलेल्या घरामध्ये राहते. या सर्व कारणांमुळे आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठीही तिला संघर्ष करावा लागत आहे.

खरंच जेवल्यानंतर चालण्याच्या सवयीनं अन्न लवकर पचतं? समोर आला रिसर्च

डॉ मेरिट म्हणतात की, '' या आजारामागील कारण शोधले गेले नाही तर आम्ही फक्त लक्षणांवर उपचार  करू. आम्ही एक आपत्कालीन विभाग आहोत, जिथे आम्ही प्रत्येकावर उपचार करतो, मग ते गंभीर स्थितीत असोत किंवा थोड्याशा चांगल्या स्थितीत असोत. आपल्या समाजातील सर्वात कमकुवत लोक याला बळी पडत आहेत हे पाहणे अत्यंत दुःखद आणि अस्वस्थ करणारे आहे. इतर डॉक्टरांच्या सल्ल्याने, रुग्णाचे आरोग्य आणि हवामान बदल यांच्यातील दुवा आता अधिक सहजपणे स्थापित केला जाऊ शकतो.'' थंडीत चांगल्या तब्येतीचं सोपं सिक्रेट, 3 प्रकारच्या भाकरी! मिळवा उबदार ताकद पटकन

ग्लासगो येथे सुरू असलेल्या COP26 शिखर परिषदेत सार्वजनिक आरोग्य आणि जलवायू समस्या यांच्यातील संबंध हा एक गंभीर विषय बनला आहे. ब्रिटनने आयोजित केलेल्या हवामान परिषदेने जागतिक नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना हवामान बदलाच्या धोक्याबाबतचा जागतिक प्रतिसाद बळकट करण्यासाठी एकत्र आणले. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य