Join us   

सकाळी चुकूनही खाऊ नका ६ पदार्थ, शरीराच्या अनेक अवयवांना होईल त्रास, वजन-कोलेस्टेरॉलही वाढेल झपाट्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2023 6:41 PM

Worst unhealthy breakfast foods to avoid in the morning : मधुमेह-कोलेस्टेरॉल-वजन वाढण्यामागे कारणीभूत आहेत नाश्त्यामध्ये खाल्ले जाणारे ६ पदार्थ

दिवस चांगला जावा यासाठी सकाळचा नाश्ता (Breakfast) हा उत्तम-हेल्दी असावा. आरोग्य सुदृढ राहावे यासाठी व्यायामासह आहाराकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. जर आपण सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्याने केली तर, आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल. पण जर उलट सुलट पदार्थ खाऊन आपण दिवसाची सुरुवात करत असाल तर, गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

सध्या धावपळीच्या जीवनात अनेकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेच जण नाश्ता स्किप करतात, किंवा अरबट चरबट खातात. असे देखील काही पदार्थ आहेत, जे दिसायला हेल्दी दिसतात, पण सकाळी खाण्यायोग्य नसतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये नक्की कोणते पदार्थ खावे? कोणते पदार्थ टाळावे? यासंदर्भातील माहिती न्यूट्रिशनिस्ट प्रियांशी भटनागर यांनी दिली आहे(Worst unhealthy breakfast foods to avoid in the morning).

फ्रुट ज्यूस

अनेक जण दिवसाची सुरुवात फ्रुट ज्यूसने करतात. पण सकाळी फ्रुट ज्यूस न पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण फळांच्या रसामध्ये फायबर नसते. शिवाय सकाळी फ्रुट ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. ज्यामुळे मधुमेह, पोटाते विकार यासह चयापचय क्रिया मंद होऊ शकते.

लग्न जवळ आलं पण अद्यापही वजन कमी झाले नाही? लाईफस्टाईलमध्ये करा ८ सोपे बदल, वजन होईल झरझर कमी

पॅनकेक्स आणि वॅफल

बरेच जण नाश्त्यामध्ये पॅनकेक्स आणि वॅफल खाण्यास पसंती दर्शवतात. खरंतर हे पदार्थ अनहेल्दी आहेत. यातून शरीराला पुरेसं पौष्टीक घटक मिळत नाही. शिवाय काम करण्याची उर्जाही कमी होऊ शकते. त्यामुळे सकाळी नाश्त्यामध्ये पॅनकेक्स आणि वॅफल खाणं टाळा.

चहा

अनेकांची सकाळ चहाशिवाय होत नाही. चहा जणू त्यांच्यासाठी एकप्रकारचे व्यसन झाले आहे. मात्र, सकाळी नाश्त्यासोबत चहा पिऊ नये. यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ यासारख्या समस्या होऊ शकतात. शिवाय रक्तातील साखरही वाढू शकते.

वजन कमी करायचं, पण व्यायाम-डाएट फॉलो होत नाही? झोपताना न चुकता करा १ सोपा उपाय, झरझर घटेल वजन

कॉफी

जर आपण दिवसाची सुरुवात कॉफीने करत असाल तर, ही सवय वेळीच बदला. सकाळी सर्वात आधी कॉफी प्यायल्याने कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो. शिवाय ब्लड प्रेशरही वाढू शकते. यासह इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

व्हाईट ब्रेड

अनेक जण दिवसाची सुरुवात सँडविच किंवा ब्रेड जॅमने करतात. पण व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यात इतर पौष्टीक घटक आणि फायबरचा अभाव असल्यामुळे, यातून शरीराला कोणतेही पोषक घटक मिळत नाही. शिवाय ब्रेडसोबत जॅम किंवा बटर खाल्ल्याने शरीरात साखर आणि  फॅट्सचे प्रमाण वाढू शकते.

पुरी-पराठा

सकाळी नाश्त्यामध्ये बरेच जण पुरी किंवा पराठा खातात. भारतीय घरांमध्ये हा नाश्ता कॉमन आहे. पण पुरी आणि पराठ्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट, सोडियम आणि तेलाचं प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य