Join us   

रोज टाच दुखते- पायावरही सूज? तुमचं लिव्हर आजारी असण्याची शक्यता, पाहा फॅटी लिव्हरची लक्षणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2024 9:10 AM

Fatty Liver: 'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या तरुण नायकाला ३१ व्या वर्षी फॅटी लिव्हरमुळे आला हार्टॲटॅक, तशी लक्षणं तुम्हालाही तर जाणवत नाहीत?

ठळक मुद्दे टाच दुखणं हे देखील एक या आजाराचं लक्षण असू शकतं. बऱ्याच महिलांना हा त्रास जाणवतो. म्हणूनच बघा तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती..

फॅटी लिव्हर हा त्रास सध्या खूप लोकांना जाणवतो आहे. अमूक व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास आहे, अशा प्रकारचं बोलणं हल्ली बऱ्याचदा आपल्या कानावर येतं. फॅटी लिव्हरमुळे ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अवघ्या ३१ वर्षांच्या मोहसीन खान या नायकाला हार्टॲटॅक आल्याची घटनाही नुकतीच घडली. त्यामुळे हा आजार नेमका काय, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय, कशी काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. टाच दुखणं हे देखील एक या आजाराचं लक्षण असू शकतं. बऱ्याच महिलांना हा त्रास जाणवतो. म्हणूनच बघा तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती.. (symptoms of fatty liver disease)

 

रक्तातले विषारी पदार्थ शोषून ते शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम लिव्हर करते. अनेक कारणांमुळे लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी जमा व्हायला सुरुवात होते. जेव्हा ती चरबी एका विशिष्ट पातळीच्या वर जाते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणून ओळखले जाते. अल्कोहोल अतिप्रमाणात घेणाऱ्या लोकांना तर त्याचा धोका आहेच.

कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

पण हल्ली व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा त्रास अल्कोहोल न घेणाऱ्या व्यक्तींनाही होत आहे. त्यामुळेच ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असणारे फळं खायला पाहिजेत. त्यातून लिव्हरमधील फॅट आणि ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती तज्ज्ञांनी versatilevivesgallery या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

 

याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात की पाऊल दुखणे, टाच दुखणे ,पायावर सूज असणे हे लिव्हरमधील बिघाडाचे कारण असू शकते. सकाळी उठल्यानंतर टाचेमध्ये टोचल्यासारखे होणे आणि काही पावलं चालली की बरे वाटणे हा त्रास अनेकांना होतो.

डायनिंग टेबलवर फोन घेऊन बसणाऱ्या कतरिना कैफला विकी कौशलही नेहमीच वैतागतो आणि म्हणतो....

बराच वेळ उभे राहून काम केले की तळपाय दुखणे आणि गुडघ्यापासून खाली बोटाने दाबून पाहिले तर खड्डा पडणे (pitting edema) हे सुध्दा फॅटी लिव्हरचे एक लक्षण आहे. आहार आणि जीवनशैलीतील छोट्या बदलांनी हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. तुम्हालाही अशा काही तक्रारी असतील तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या..   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स