दाताचे दुखणे हे अगदी कोणत्या वयातही उद्भवू शकते. गोड पदार्थ किंवा व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे दातांमध्ये वेदना आणि सूज येऊ लागते.(Homemade Spice Powder for White Teeth) आपल्या डॉक्टर नेहमी दिवसातून दोन वेळा ब्रश करण्याचा सल्ला देतात.(Natural Remedies for Yellow Teeth and Bleeding Gums) परंतु आपण या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. दात दुखायला लागला की, आपल्या नकोसे होते.(Spices for Teeth Whitening and Gum Health) अशावेळी डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. बोलताना किंवा हसताना बरेचदा आपल्या दातांमुळे समस्या निर्माण होतात. दात पिवळे असणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे या समस्यांना सामोरे जावे लागते. (Effective Spice Powder for Healthy Gums and Teeth) नकळत तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले की, त्याचा आपल्या दातांवर परिणाम होतो.(Cure Bleeding Gums and Yellow Teeth with Homemade Spices) रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासणे चांगले मानले जाते. यामुळे तोंडात निर्माण झालेल्या बॅक्टेरियांपासून आपला बचाव होतो.(Home Remedy for Yellow Teeth and Gum Health) दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर डॉक्टरांकडे जा. परंतु, त्याआधी हा घरगुती पदार्थांपासून बनवलेला पावडर वापरुन बघायला हरकत नाही. ज्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात मोत्यासारखे चमकतील. (Spices for Pearly White Teeth and Strong Gums)
गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा बेढब दिसतो? रोज करा ही ५ कामं, डबल चिनपासून सुटका
साहित्य
लवंग - १० ग्रॅम दालचिनी - ७.५ ग्रॅम बडीशेप - ५ ग्रॅम वेलची - २.५ ग्रॅम काळे मीठ - १ चमचा ग्रेड बेंटोनाइट माती - ७५ ग्रॅम पेपरमिंट ऑइलचे - १ ते २ थेंब
कृती
1. सगळ्यात आधी लवंग, दालचिनी, बडीशेप, वेलची, काळे मीठ चांगले वाटून घ्या.
2. त्यानंतर त्यात मुलतानी माती घालून हे चांगले चाळून घ्या.
3. यात आता पेपरमिंट ऑइलचे काही थेंब घालून हवाबंद डब्यात ठेवा.
वापर कसा करायचा?
हा पावडर वापरल्यामुळे आपल्या दातांवर जमा झालेले बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होईल तसेच दात चमकतील. दातांना लागलेली कीड किंवा हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव कमी होईल. अनेकदा बोलताना किंवा हसताना आपल्याला दातांची दुर्गंधी येते, हा पावडर वापरल्याने दात स्वच्छ तर होतील पण त्यातून येणारा वास कमी होईल.