आपण आपल्या चेहऱ्याच्या स्वच्छतेची काळजी घेतो. सनस्क्रीन, नाईट क्रिम अशा वेगवेगळ्या क्रिम्स वापरल्या जातात पण दातांच्या स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही, रोज दोन्हीवेळा घासूनही अनेकांचे दात पिवळे दिसतात. (Oral Care Tips) आपण ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठेही चारचौघात बोलतो, हसतो तेव्हा पिवळ्या दातांमुळे वाईट इम्प्रेशन पडू शकतं आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. (How to get rid from yellow teeth)
दात नेहमीच स्वच्छ चांगले दिसावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोपे घरगुती उपाय दात चमकवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. डेंटल क्लिनिकचा खर्चही वाचेल आणि दात स्वच्छही दिसतील. सतत टूथपेस्ट बदलण्यापेक्षा दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले तर चांगले परीणाम दिसू शकतात.
1) कडुलिंब
कडुलिंब औषधी गुणांमुळे प्रचलित आहे. सगळ्यात आधी कडूलिंबाची पानं भांड्यात गरम पाण्यात उकळवा, नंतर पाणी गाळून घ्या आणि थंड होण्याची वाट पहा. आता या पाण्याने गुळण्या करा. कडुलिंबाच्या कडूपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात.
2) कोको पावडर
कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाचा वापर केल्याने दातांची चमक पुन्हा येईल.
3) पुदिन्याची पानं
पुदिना खूप फायदेशीर मानला जातो. 3 किंवा 4 पाने बारीक करून खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण टूथब्रशवर लावून दातांवर घासून घ्या.
4) मोहोरीचं तेल
पांढरे आणि चमकदार दात येण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलासह मीठ किंवा हळद देखील वापरू शकता. यासाठी अर्धा चमचा हळद पावडरमध्ये 1 चमचे मोहरीचे तेल मिसळा आणि ही पेस्ट बोटांच्या मदतीने दातांवर हळूवारपणे चोळा. या मिश्रणाचा नियमित वापर करा. यामुळे काही दिवसातच दातांचा पिवळेपणा पूर्णपणे दूर होईल.
5) केळ्याचं साल
केळीच्या सालीचा पांढरा भाग 1 किंवा 2 मिनिटे दातांवर रोज घासून मग रोज त्याच प्रकारे ब्रश करा. केळीमध्ये असलेले पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे दात शोषून घेतात. यामुळे दात पांढरे तर होतातच पण ते मजबूतही होतात. केळीच्या सालीचा ही उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून पाहा आणि मग पाहा दातांचा पिवळेपणा कसा निघून जाईल.