Join us   

जेवण कधी आणि कसं करावं? रामदेव बाबा सांगतात जेवणाचे १० बेसिक नियम,आजार दूर-फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 10:17 AM

Yog Guru Baba Ramdev Explains When How to Eat Food Baba Ramdev : सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करू  शकता.

योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) नेहमीच लोकांना आरोग्याशी संबंधित टिप्स  आणि खाण्याच्या पिण्याच्या पदार्थांबाबत जागरूकता पसरवत असतात. ज्याचे रोजच्या आयुष्यात पालन केले तर तुम्ही बरीच वर्ष  निरोगी राहाल याशिवाय कोणत्याही  आरोग्याच्या समस्याही उद्भवणार नाही. योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी चांगल्या आरोग्यासाठी रोज आहार कसा घ्यावा, याबाबत काही सोपे पॉईट्स सांगितले आहेत. (Yog Guru Baba Ramdev Explains When How to Eat Food Baba Ramdev)

१) आयुर्वेदानुसार वातावरणानुसार (Ref) खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो. जसं की हिवाळ्याच्या दिवसांत गगरम खायला हवं आणि थंडीच्या दिवसाांत गरम खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याशिवाय वात, पित्त आणि कफ दोष नियंत्रणात राहतील असे भोजन करावे. 

२) असं पाहिलं जातं की लोक घशात येईपर्यंत खातात. ठरलेल्या क्वाटिटीपेक्षा जास्त खाल्ल्यास त्याचा परिणाम दिसून येतो.  लोकांनी कमी अल्पाहारी म्हणजे कमीत कमी प्रमाणात खायला हवं.

३) सकाळच्या नाश्त्याला तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करू  शकता.  सॅलेड खाऊ  शकता.  ऑलिव्ह ऑईल किंवा मोहोरीच्या तेलाने ड्रेसिंग करा.

४) योगगुरू बाबा रामदेव सांगतात की जेवणाच्या १ तास आधी पाणी पिऊ नये.कोणत्यावेळी कोणते पदार्थ खावेत यावर बाबा रामदेव सांगतात सकाळी दही, दुपारी ताक आणि रात्रीच्या  जेवणाच्या १ तास आधी गरम दूध घ्यायला हवं. दूधाबरोबर मीठयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. इतकंच नाही तर दही आणि ताकाचे सेवन करू नये. 

५) सॅलेडपासून शिजवलेल्या अन्नापर्यंत सगळ्यात आधी काय खावं ते माहीत असायला हवं. सकाळी पोटभर नाश्ता करावा, दुपारी थोडं जास्त खाऊ शकता आणि रात्री त्यापेक्षा कमी खा. 

६) आधी सॅलेड, मोड आलेले कडधान्य अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. सॅलेड मोड आलेले कडधान्य नेहमी कच्चे खावेत. विरुद्ध आहार घेणं टाळा. दूधाबरोबर कधीच व्हिटामीन सी युक्त आंबट फळाचे सेवन करू नये. 

७) दूधाबरोबर व्हिटामीन सी युक्त पदार्थांचा समावेश करू नका. आजकाल दूधात अनेक पदार्थांमध्ये फ्रुट् मिसळून कस्टर्ड तयार केले जाते. जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.  

बदाम-पनीर रोज खाणं परवडत नाही? १० रूपयांत चारपट जास्त प्रोटीन देतात २ पदार्थ; ताकद येईल

८) दूधाबरोबर कधीच टरबूज किंवा खरबूज खाऊ नका.  जेवल्यानंतर कधीच पाणीसुद्धा पिऊ नये. टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणीसुद्धा पिऊ नका.

९) गोड पदार्थ खायल्ल्यानंतर रायता खाऊ नका. त्यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. 

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

१०) जेवल्यानंतर १ तास पाणी पिऊ नये.  ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य