Join us   

पोट साफ होत नाही, करा रोज ४ आसनं, कॉन्स्टिपेशनचा त्रास होईल लवकर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2022 6:32 PM

Yoga Asanas For Constipation Problem : बद्धकोष्ठतेमुळे पोट साफ होत नसेल तर करायलाच हवीत ही आसनं...

ठळक मुद्दे पोट साफ व्हावं यासाठी घरगुती उपायांबरोबरच व्यायामाचा म्हणजेच योगासनांचाही आधार घ्यायला हवा...नियमितपणे काही आसनं केल्यास पोटाची हालचाल होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

सकाळी उठल्या उठल्या कोणतं काम आधी करायला हवं तर ते पोट साफ करण्याचं. सकाळी एकदा पोट नीट साफ झालं की आपल्याला दिवसभर छान फ्रेश वाटतं. पण वेळच्या वेळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर आळस, कंटाळा, अस्वस्थता असं काहीतरी विचित्रं होत राहतं. पोट साफ न होण्यामागे कॉन्स्टीपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता हे एक महत्त्वाचे कारण असू शकते (How to Get Rid from Constipation). सततची बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, अपुरी झोप, पाणी कमी प्रमाणात पिणे, व्यायाम न करणे अशी अनेक कारणे असू शकतात. संडासला गेल्यावर कुंथायला लागणे आणि खालच्या बाजूला दुखणे, शौचाला घट्ट होणे, बाहेर येताना त्रास होणे, पोट योग्य पद्धतीने साफ न होणे, रक्त येणे अशा समस्या उद्भवतात (Yoga Asanas For Constipation Problem). 

चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना हा त्रास सतावत असून त्यावर वेळीच योग्य ते उपाय न केल्यास भविष्यात गंभीर दुखणी डोके वर काढण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठतेसाठी डॉक्टर काही वेळा आपल्याला लॅक्झिटीव्ह औषधे लिहून देतात. याशिवाय सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे, रात्री झोपताना तूप आणि कोमट पाणी घेणे, केळं खाणे असे काही ना काही उपाय आपण करतो. पण तरीही पोट साफ होण्यास अडचणी येत असतील तर मात्र यावर कायमचा उपाय करायला हवा. आहारातील बदलांबरोबरच नियमितपणे काही योगासने केल्यास त्याचा पोट साफ होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. पाहूयात ही योगासने कोणती आणि ती कशी करायची.

१. अर्ध मस्त्येन्द्रासन 

- पाय सरळ करुन पाठीच्या कण्यात ताठ बसा. - डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करुन पायाचा तळवा नितंबाला लागेल असा घ्या. - उजवा पायाचे पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलिकडे टेकवा. - डाव्या हाताने उजव्या पायाचे पाऊल पकडण्याचा प्रयत्न करावा.  - पोटातून मागे वळून उजवा हात 

(Image : Google)

२. सुप्त मत्स्येंद्रासन

- पाठीवर झोपा - दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीला चिकटलेले ठेवा. - डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायावरुन उजव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करा. - पाय उजवीकडे नेत असताना मान डावीकडे वळवा.  - यामुळे शरीराला ताण पडून पोटाचे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.

(Image : Google)

३. भुजंगासन

-. पोटावर झोपा - दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूला ठेवा - कंबरेतून वर उठा आणि मागे वाका.  - बेंबीपर्यंतचा भाग वर उचलला जाईल असे पाहा - पायाचा पूर्ण भाग जमिनीला टेकलेला राहील आणि दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले राहतील याची काळजी घ्या.

(Image : Google)

४. हलासन

- पाठीवर झोपा - दोन्ही हात शरीराच्या बाजूला जमिनीला टेकलेले ठेवा. - पाय आणि पाठ कंबरेतून पर उचला आणि पायाची बोटे डोक्याच्या मागे जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा.  - खांदे आणि मानेच्या भागावर जोर पडण्याची शक्यता असते.  - पोटावरही दाब पडल्याने पोट मोकळे होण्यास मदत होते.  

(Image : Google)
 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सयोगासने प्रकार व फायदेफिटनेस टिप्स