Join us   

नजर कमजोर झालीये? ६ उपाय, चष्म्याचा नंबर होईल कमी, दृष्टी सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 11:50 AM

Yoga For Weak Eye sight : तासनतास मोबाईल पाहून लॅपटॉपवर काम करून डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा.

आजकाल कमी वयात लोक डोळ्यांवर चश्मा लावत आहेत. चश्मा लागण्याचं मूळ कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं. पोषक तत्वांची कमतरता हे अनुवांशिक कारण असू शकतं. डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी तुम्ही लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करू शकता. योगा एक्सपर्ट रूबिका यांनी काही व्यायाम प्रकार करून तुम्ही डोळ्यांचा चश्म्याचा नंबर कमी करता येतात. (Remedy for weak eye sight) या उपायाने चश्मा उतरवण्यास मदत होते. (Yoga For Weak Eye sight)

रिपोर्टनुसार पामिंग एक्सरसाईज केल्यानं दृष्टी वाढते. यामुळे डोळे रिलॅक्स राहतात. थकवा दूर होतो. पामिंग व्यायाम करण्यासाठी आपल्या दोन्ही हातांना एकमेकांवर घासा आणि काही वेळासाठी डोळ्यांवर ठेवा. ५ ते ७ वेळा हा उपाय केल्यानं डोळ्यांचा थकवा दूर होण्यास मदत होईल. (Yoga can prevent eyesight issues as you age)

तासनतास मोबाईल पाहून लॅपटॉपवर काम करून डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा.  क्लॉकवाईज आणि एंटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कमीत कमी  ५ वेळा डोळे फिरवा. दिवसातून दोनवेळा हा उपाय केल्यानं डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळे चांगले राहतात.

पापण्या मिचकवा

पापण्या मिचकावल्याने डोळ्यांवरील ताण  दूर होतो. 2 सेकंद डोळे बंद करा, नंतर उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करा. हे किमान 5-7 वेळा पुन्हा करा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा आणि लाल डोळ्यांची समस्या दूर होईल.

२०-२०-२० हा नियम फॉलो करा

डोळे निरोगी ठेवण्याचा हा एक अतिशय सोपा आणि ट्रेंडी मार्ग आहे. नेत्ररोग तज्ज्ञ देखील हे करण्याची शिफारस करतात. या 20-20-20 नियमात, तुम्हाला फक्त लॅपटॉपवर काम करताना दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्यावा लागेल आणि तुमच्यापासून किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहावे लागेल. या व्यायामामुळे दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते.

डोळ्यांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच धुम्रपान, मद्यपान यांसारख्या हानिकारक सवयीही मर्यादित प्रमाणात सेवन कराव्यात. नेत्र तपासणीसाठी नियमितपणे डॉक्टरांकडे जा. लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतात, अशा स्थितीत त्यांची नियमित नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य