अनेकदा असं होतं की जेव्हाही कधी तुम्ही बाहेरचं खाता जसं की मैद्याचे पदार्थ, जंक फूड्स, मसालेदार पदार्थ तेव्हा पोट साफ होत नाही (Constipation Relief Tips). एक, दोन दिवस मल बाहेर निघण्यास त्रास होतो. काही घरगुती उपाय केल्यानंतर किंवा गोळी घेतल्यानंतर पोट खाली होतं. पण ७ दिवसांत ३ वेळा तुम्हाला असा त्रास असेल तर समजून जा की तुम्हाला गॅस, बद्धकोष्टतेचा त्रास आहे. (Yogasan For Constipation)
अनेक दिवस पोट व्यवस्थित रिकामं झालं नाही तर भूक कमी होते. हा त्रास लवकर मिटल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. काही घरगुती उपाय, रोजच्या सवयी सुधारून तसंच नियमित काही बेसिक योगासनं करून तुम्ही गॅसचा त्रास टाळू शकता. बाऊल मुव्हमेंट योग्य राहते. ३ योगासनं गॅसच्या त्रासापासून सुटका देण्यात फायदेशीर ठरतील. (Malasana For Constipation Relief)
मलासन
मलासन हे खूपच सोपं योगासन आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पाय फरशीवर सपाट ठेवून गुडघे स्ट्रेच करून बसा. हात जोडून दोन्ही हातांचा पायांना स्पर्श होऊ द्या. ही मुद्रा कुल्हे उघडण्यास मदत करते. ज्यामुळे मल त्याग करणं सोपं होतं. मलासन नियमित केल्यानं तुम्हाला गॅसेस, बद्धकोष्टतेचा त्रास होणार नाही. याशिवाय पाय, पेल्विस आणि मांसपेशी मजबूत राहण्यास मदत होईल. सांधेदुखीचा त्रास उद्भवणार नाही.
पोट साफ होत नसल्यास मलासनात बसून गरम पाणी प्या. हे उपाय केल्यानं त्वरीत पोट साफ होण्यास मदत होईल. गरम पाण्यात लिंबू घालून या पाण्याचे सेवन करा ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासही मदत होईल. गरम पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेट राहतं. संडासला व्यवस्थित होते आणि झोपही चांगली येते.
रोज फक्त १ आवळा या पद्धतीनं खा; १० आश्चर्यकारक फायदे, पचनाचे त्रास दूर-चेहऱ्यावर येईल ग्लो
लिंबात लॅक्सेटीव्ह गुणधर्म असतात, त्यातील सिट्रिक एसिड पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करते. यातील डिटॉक्सिंग गुणधर्मांमुळे टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. कॉन्स्टिपेशनपासून आराम मिळतो आणि बाऊल मुव्हमेंट रेग्युलर होते. लिंबामुळे लिव्हरमध्ये बाईल प्रोडक्शन चांगल होते. पचनक्रिया चांगली राहते. मलासन करण्यासाठी नॅच्युरल स्क्वॅट्स पोझिशनमध्ये बसा. ज्यामुळे बाऊल मुव्हमेंट चांगली होण्यास मदत होईल.