योग गुरू बाबा रामदेव यांनी काही हेल्थ टिप्स आणि फूड टिप्स आणि शेअर केल्या आहेत. आपल्या रोजच्या जेवणात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही तब्येतीची काळजी घेऊ शकता. जेवण करताना छोट्या छोट्या नियमांचे पालन केले तर तुम्हाला मोठे आजार होणार नाहीत. योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल आणि वजन कमी करण्यासही मदत होईल. (Yogguru Baba Ramdev Explains When And How to Eat Food)
१) आयुर्वेदात खाण्यापिण्याबाबत अनेक नियम आहेत. हिवाळ्यात गरम खाणं आणि ऊन्हाळ्यात थंड खायला हवं. शरीरासाठी ते फायदेशीर ठरते. पित्त आणि कफ दोषांनुसार जेवण करायला हवं.
२) अनेकदा लोक घशापर्यंत येईपर्यंत खातात. नेहमी अल्पाहार म्हणजेच कमीत कमी प्रमाणात आहार घ्यावा आणि कमी खायला हवं.
३) सकाळच्या नाश्त्याची सुरूवात मोड आलेल्या कडधान्यांनी करा. तुम्ही सॅलेड खात असाल तर त्यावर ऑलिव्ह ऑईल घालू शकता. मोहोरीच्या तेलाने ड्रेसिंग करू शकता. योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितले की जेवल्यानंतर १ तास पाणी पिऊ नये.
४) योग गुरू बाबा रामदेव सांगतात की सकाळी दही, दुपारी ताक आणि रात्रीच्या जेवणानंतर १ तासाने गरम दूध प्यायला हवं. दूधाबरोबर मीठ घातलेल्या वस्तूंचे सेवन करू शकता. स्किनसंबंधित समस्याही उद्भवत नाहीत. रात्रीच्यावेळी दही किंवा ताकाचे सेवन करू नका.
५) जेवताना सॅलेड किंवा इतर पदार्थांचे सेवन करा. जेवताना सगळ्यात आधी सूप प्या. हलक्या जेवणाने सुरूवात करा. जेवणात हेवी पदार्थांचे सेवन करू नका.
६) सॅलेड आणि मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करा. याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. सॅलेड आणि मोड आलेले पदार्थ खा.
७) सॅलेड खाल्ल्यानंतर तुम्ही डाळ, भाजी, चपाती, भात या पदार्थांचे सेवन करू शकता.
८) जेवण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी गोड पदार्थ खा कारण असे पदार्थ पचायला थोडे जड असतात. आधी गोड खाणं टाळावे.
९) विरुद्ध आहार म्हणजेच एकत्र दोन विरुद्ध पदार्थांचे सेवन करू नका. याचा इम्यूनिटीवर चुकीचा परिणाम होतो. कॅन्सरसारखे गंभीर आजारही उद्भवू शकतात. गंभीर स्थितीत मृत्यू होण्यााचा धोका असतो. दूधाबरोबर ताकाचे सेवन करू नका.
रोज चालता तरी पोट-मांड्या जाडजूड? किती पाऊल आणि कधी चालावं याचं सोपं गणित, मेंटेन व्हाल
१०) दूधासोबत कधीच व्हिटामीन सी युक्त फळांचे सेवन करू नका. आजकाल दूधात मिसळून अनेकजण फ्रुटस कस्टर्ड खातात जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते.