Join us   

सायंकाळी चहा पिणं धोक्याचं, ऑफिसातून आल्या आल्या १ कप गरम चहा पीत असाल तर सावधान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 6:44 PM

You must not consume tea in the evening; find out why सायंकाळी चहा पिण्याची सवय असेल तर तातडीने ती सवय मोडा

चहाप्रेमींच्या मते 'चहाला वेळ नसतो, पण वेळेला चहा लागतोच'. चहाप्रेमी कधीही चहा प्यायला तयार असतात. परंतु, चहाला वेळ नसला तरी, चहा पिण्याची देखील एक ठराविक काळ - वेळ नक्कीच आहे. सायंकाळ झाली की, लोकांमध्ये चहा पिण्याची तलफ वाढते. कटिंग तरी चहा हवाच असे म्हणतात, पण सायंकाळच्या वेळेस चहा पिणे का टाळावा? यासंदर्भात, आयुर्वेदिक चिकित्सक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी सायंकाळी चहा पिणे का टाळावे याबाबतीत माहिती दिली आहे.

त्यांच्या मते, ''सुमारे 64% भारतीयांना दररोज चहा प्यायला आवडते, तर 30% पेक्षा जास्त लोकांना सायंकाळच्या वेळी चहा पिण्याची इच्छा होते. परंतु, झोपेच्या १० तास आधी कॅफिन टाळणे उत्तम ठरू शकते. हे यकृत डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते, कोर्टिसोल कमी करते आणि निरोगी पचनक्रिया करण्यास मदत करते. पण संध्याकाळी कोणी चहा प्यावा कोणी टाळावा, हे त्यांच्या वैयक्तिक कारणांवर आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींवर अवलंबून आहे''(You must not consume tea in the evening; find out why).

सायंकाळी कोणी चहा प्यावा?

- जे लोक रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात.

- ज्यांना अॅसिडिटी किंवा गॅस्ट्रिकचा त्रास होत नाही.

- ज्यांचे पचन निरोगी आहे.

- ज्यांना झोपेची समस्या नाही.

रोज सकाळी उपाशीपोटी १ चमचा तूप खाण्याचे ६ फायदे, कॉन्स्टिपेशन आणि वजन दोन्ही होईल कमी

- जे अर्धा किंवा १ कप चहा पेक्षा कमी चहा पितात.

सायंकाळी कोणी चहा पिऊ नये?

- ज्यांना झोपेची समस्या आहे.

- जे चिंताग्रस्त आणि तणावपूर्ण जीवन जगतात

- ज्यांना वातेचा त्रास आहे.

- ज्यांना वजन वाढवायचे आहे.

- ज्यांना कमी भूक लागते.

खूप घाम आला तर वजन कमी होते, फळे खाल्ली तर लवकर घटते? हे समज खरे की खोटे?

- ज्या लोकांना हार्मोनल समस्या आहेत.

- ज्यांना बद्धकोष्ठता / ऍसिडिटी किंवा गॅसेसची समस्या आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य