मीठ आणि साखरेशिवाय पदार्थाला चव लागत नाही (Microplastics). पदार्थात विविध प्रकारचे मसाले घाला. चिमुटभर मीठाची सर तर कशालाच नाही. बाजारात विविध प्रकारच्या ब्रँण्डचे मीठ आणि साखर मिळते (Health Tips). प्रत्येक ब्रँण्ड आपलेच मीठ आणि साखर शुद्ध असल्याचं दावा करतात. पण खरंच आपल्या घरात असलेलं मीठ आणि साखर शुद्ध आहे का? तुम्हाला असं कुणी सांगितलं की तुम्ही खास असलेल्या मीठात आणि साखरेत प्लास्टिकचे कण आहेत आणि ते रोज तुमच्या पोटात जातात तर..
टॉक्सिक्स लिंक नावाच्या पर्यावरण संशोधन संस्थेने, 'मायक्रोप्लास्टिक्स इन सॉल्ट अँड शुगर' नावाचा एक अभ्यास केला आहे. पाच प्रकारची साखर आणि आणि १० प्रकारच्या मीठाची या अभ्यासात चाचणी करण्यात आली. यानंतर या संस्थेने या अभ्यासाचा हा अहवाल प्रसिद्ध केला(Your salt and sugar are contaminated with microplastics).
हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते? रोज 'या' फळाचा रस प्या; दीपिका पदुकोणच्या डायटिशियनचा सल्ला
ज्यात त्यांना भारतीय ब्रँण्ड्समध्ये छोट्या-छोट्या तुकड्यांच्या स्वरूपात मायक्रोप्लास्टिक असल्याचं आढळून आलं. या मायक्रोप्लास्टिकचा आकार ०.१ मिमी ते ५ मिमीपर्यंत असतो. हे मायक्रोप्लास्टिक पॅकेज्ड आणि खुल्या अशा दाेन्ही प्रकारच्या मीठ आणि साखरेमध्ये आढळतात.
टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक-संचालक रवी अग्रवाल यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'आमच्या अभ्यासाचा मूळ उद्देश मायक्रोप्लास्टिक्सवरील वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणं हा होता. मायक्रोप्लास्टिक्स खाद्य पदार्थात असू नये यावर धोरणात्मक काम व्हायला हवं.’
तुम्ही गरजेपेक्षा जास्त साखर खात आहात, शरीर देते ६ संकेत; दुर्लक्ष केलं तर ' ही ' शिक्षा अटळ
तसेच टॉक्सिक्स लिंकचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितलं की, 'आमच्या अभ्यासामध्ये सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. हे मायक्रोप्लास्टिक्स मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे यावर आणखी संशोधनाची गरज आहे.'