Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पुण्यात झिकाचे २ रुग्ण, आजाराची लक्षणं कशी ओळखायची? डॉक्टर सांगतात झिकाची लागण होऊ नये म्हणून....

पुण्यात झिकाचे २ रुग्ण, आजाराची लक्षणं कशी ओळखायची? डॉक्टर सांगतात झिकाची लागण होऊ नये म्हणून....

What Are The Symptoms Of Zika Virus: पुण्यामध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याचे २ रुग्ण आढळून आले आहेत (zika virus patient in Pune). त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:ची, घरच्यांची थोडी विशेष काळजी घ्यावी, असं डॉक्टर सांगत आहेत. (Prevention and control measures for Zika virus disease)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 12:34 PM2024-06-27T12:34:58+5:302024-06-27T12:38:03+5:30

What Are The Symptoms Of Zika Virus: पुण्यामध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याचे २ रुग्ण आढळून आले आहेत (zika virus patient in Pune). त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:ची, घरच्यांची थोडी विशेष काळजी घ्यावी, असं डॉक्टर सांगत आहेत. (Prevention and control measures for Zika virus disease)

zika virus disease, what are the symptoms of zika virus, Prevention and control measures for Zika virus disease, zika virus patient in Pune | पुण्यात झिकाचे २ रुग्ण, आजाराची लक्षणं कशी ओळखायची? डॉक्टर सांगतात झिकाची लागण होऊ नये म्हणून....

पुण्यात झिकाचे २ रुग्ण, आजाराची लक्षणं कशी ओळखायची? डॉक्टर सांगतात झिकाची लागण होऊ नये म्हणून....

Highlightsहा आजार आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन डॉक्टर करत आहेत.

पावसाळ्यात संसर्गजन्य आजार वाढत जातात. त्यामुळे या दिवसांत संसर्गापासून लांब राहण्यासाठी प्रत्येकानेच स्वत:ला जपले पाहिजे. पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांमार्फत होणारे डेंग्यू, मलेरिया असे आजारही वाढतात. हे आजार ज्या एडिस डासामुळे होतात, त्याच डासामुळे झिका व्हायरसही पसरला जातो. झिका व्हायरसने बाधित असणारा डास जेव्हा निरोगी व्यक्तीला चावतो, तेव्हा त्या व्यक्तीला झिका व्हायरसची लागण होऊ शकते (what are the symptoms of zika virus?). जगभरात या आजाराचे तुरळक रुग्ण सापडत असले तरी हा आजार आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन डॉक्टर करत आहेत. (Prevention and control measures for Zika virus disease)

 

झिका व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं कोणती?

त्वचेवर पुरळ येणे आणि त्याला खाज येणे.

सर्दीसोबतच तापही असणे.

जम्मूची आर्शिया पोहोचली अमेरिकेत, तिचे नृत्य पाहून परिक्षकांनी घातली तोंडात बोटे! डान्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल..

खूप घाम येणे. 

स्नायूंमध्ये वेदना असणे.

तीव्र डोकेदुखी आणि खूप थकवा.

भूक कमी होणे किंवा काही खाण्याची इच्छा न होणे.

 

आजार टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

१. झिका आजाराची लागण डासांमुळे होते. त्यामुळे आपल्या आजुबाजुला डास असणार नाहीत किंवा निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

२. पाच दिवसांतून एकदा घरातली पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी. कारण भांड्याच्या ओलसर भागांत डासांची अंडी असू शकतात. ती भांडी पुर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतरच पुन्हा त्यात पाणी भरा. 

वजन कमी करायचं? बघा चिमूटभर ओव्याची कमाल! वजन घटविण्यासाठी 'असं' प्या ओव्याचं पाणी

३. घराच्या आजुबाजुला असणाऱ्या कोणत्याही वस्तूमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या.

४. घरात मनी प्लांट, बांम्बू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पती ठेवत असाल तर त्यात पाणी साचून ठेवू नका.

५. डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा पुरेपूर वापर करा. 

६. अंग झाकून राहील असे कपडे घाला. जेणेकरून डास चावणार नाहीत.

 

Web Title: zika virus disease, what are the symptoms of zika virus, Prevention and control measures for Zika virus disease, zika virus patient in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.