Lokmat Sakhi >Health > जन्मत:च खूप कमी वजन असलेल्या बाळांचे वजन कसे वाढवता येते? काय काळजी घ्यायची?

जन्मत:च खूप कमी वजन असलेल्या बाळांचे वजन कसे वाढवता येते? काय काळजी घ्यायची?

Low Birthweight in Newborns : जन्मत:च खूप कमी वजन असेल तर बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:31 PM2023-08-11T18:31:17+5:302023-08-11T19:14:02+5:30

Low Birthweight in Newborns : जन्मत:च खूप कमी वजन असेल तर बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी.

Low Birth Weight Baby Risks Types, and Causes : Low Birthweight in Newborns | जन्मत:च खूप कमी वजन असलेल्या बाळांचे वजन कसे वाढवता येते? काय काळजी घ्यायची?

जन्मत:च खूप कमी वजन असलेल्या बाळांचे वजन कसे वाढवता येते? काय काळजी घ्यायची?

कमी वजन असलेल्‍या नवजात बाळांचे वजन वाढवण्‍याच्‍या महत्त्‍वपूर्ण पद्धती 

डॉ. श्रुती जैन (स्‍तनपान सल्‍लागार)

जन्‍माच्‍या वेळी २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असेल तर नवजात बाळांना अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाळाचं वजन वाढणं गरजेचं असतं.  भारतात जवळपास २० टक्‍के नवजात बालकांचे लो-बर्थवेट असते. या बाळांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं वजन वाढवण्यासाठी काही गोष्टी करायला हव्या.. (Low Birthweight in Newborns)

काय करता येईल?

१.  विशेष स्तनपान:. आईच्या दुधात भरपूर पौष्टिक घटक आणि ॲण्‍टीबॉडीज असतात, जे तान्‍ह्या मुलांचे वजन वाढण्यास मदत करतात. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक सर्व पौष्टिक घटक असतात.

२. वारंवार स्‍तनपान: करण्‍याचे प्रमाण वाढवा. पोटाची क्षमता कमी असल्‍यामुळे ही  बाळं मोठ्या प्रमाणात दूध पिऊ शकणार नाहीत. त्‍यांना लहान प्रमाणात, पण वारंवार स्‍तनपान केल्‍याने त्‍यांचे वजन वाढण्‍यास मदत होऊ शकते.

३. स्किन-टू-स्किन संपर्क: तान्‍हे बाळ आणि पालक किंवा केअरगिव्‍हर यांच्‍यामध्‍ये वारंवार स्किन-टू-स्किन संपर्क वाढवा. या पद्धतीला कांगारू केअर असे म्‍हणतात. या पद्धतीमुळे तान्‍ह्या बाळाचे वजन वाढण्‍यास आणि आरोग्‍यामध्‍ये सुधारणा होण्‍यास मदत होते.

४. स्‍तनपान स्‍पेशालिस्‍टचा सल्‍ला घ्या. स्तनपानाची योग्य पद्धत शिकून घ्या. बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने वरचे दूध किंवा फॉर्म्यूला दूध देणं योग्य, मनाने देऊ नका.

Web Title: Low Birth Weight Baby Risks Types, and Causes : Low Birthweight in Newborns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.