Lokmat Sakhi >Health > फक्त तंबाखू, सिगारेटमुळे नाही तर या गोष्टीनं होतो फुफ्फुसांचा कॅन्सर; डॉ. नेने सांगतात कारणं, उपाय

फक्त तंबाखू, सिगारेटमुळे नाही तर या गोष्टीनं होतो फुफ्फुसांचा कॅन्सर; डॉ. नेने सांगतात कारणं, उपाय

Lungs Cancer Causes, Prevention : डॉक्टर. श्रीराम नेने यांनी फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत अधिक माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 12:18 PM2024-11-09T12:18:57+5:302024-11-09T12:19:51+5:30

Lungs Cancer Causes, Prevention : डॉक्टर. श्रीराम नेने यांनी फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत अधिक माहिती दिली आहे.

Lungs Cancer Causes : Lungs Cancer Causes by Dr. Shriram Nene Connection Of Lungs Cancer And Pollution | फक्त तंबाखू, सिगारेटमुळे नाही तर या गोष्टीनं होतो फुफ्फुसांचा कॅन्सर; डॉ. नेने सांगतात कारणं, उपाय

फक्त तंबाखू, सिगारेटमुळे नाही तर या गोष्टीनं होतो फुफ्फुसांचा कॅन्सर; डॉ. नेने सांगतात कारणं, उपाय

असं मानलं जातं की धुम्रपान करणारे लोक फुफ्फुसांच्या कॅन्सरने पीडित असतात पण प्रदूषणामुळेही आरोग्यामुळे नुकसान होऊ शकते. प्रदूषणामुळे लोकांना फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका उद्भवत आहे.(Lungs Cancer Causes, Prevention) अभिनेत्री माधुरी  दीक्षित नेनेचे  पती डॉक्टर. श्रीराम नेने यांनी फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत अधिक माहिती दिली आहे. प्रदूषणामुळे कमी वयात लोक फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या विळख्यात अडकत आहेत. (Lungs Cancer Causes by Dr. Shriram Nene)

फुफ्फुसांचा कॅन्सर काय आहे?

फुफ्फुसांचा कॅन्सर अशावेळी होतो जेव्हा फुफ्फुसांमध्ये  असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होते. कॅन्सर सगळ्यात आधी फुफ्फुसांमध्ये वाढायला सुरूवात होते. शरीरात कुठेही आजार पसरू शकतो.  नॉन  स्मॉल सेल लंग्स कॅन्सर फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या जवळपास  ८५ टक्के भाग आहे. यात एडनोकार्सिनोमा, स्क्व्रॅम्स सेल, कार्सिनोमा आणि लार्ज सेल अनडिफरेंशिएडेट कार्सिनोमाचा समावेश आहे.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं

सतत येणारा खोकला, श्वास घ्यायला त्रास होणं, छाती किंवा खांद्यांमध्ये वेदना, छातीतले इन्फेक्शन कमी  न होणं, खोकला रक्त बाहेर येणं, थकवा येणं, वजन कमी होणं, पोटदुखी, सांधेदुखी.


फुफ्फुसांचे आजार टाळण्याचे उपाय

सर्दी-कफ झाला असेल तर आपण वाफ घेतो. फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी नियमितपणे वाफ घेणे आवश्यक आहे. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतोच पण थोडाफार कफ असेलच तर तो पातळ करण्याचे काम वाफेमुळे सोपे होते. यामुळे श्वास घेण्याची क्रिया अगदी सहज होते आणि व्यक्तीला आराम मिळतो. 

पोटाचे टायर्स सुटलेत-कंबर लठ्ठ दिसते? २१ दिवस हे पदार्थ खा, वितळेल चरबी-फिट दिसाल

शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी शिंका, खोकला अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये जमा झालेल्या अनावश्यक गोष्टी बाहेर येण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला श्वसनमार्गात काही अडथळे आल्यासारखे वाटत असेल तर तज्ज्ञ शिंक काढण्याचा किंवा खोकण्याचा सल्ला देतात.

पोट कमी करायचंय, जिभेवर ताबा नाही? १ ग्लास पाण्यात ५ पदार्थ मिसळून प्या, भराभर वजन घटेल

श्वसनमार्गाला सूज आली असेल तर श्वास घ्यायला अडचण येते, यामुळे छातीत जडपणा वाटतो. अशावेळी लसूण, आलं, हळद यांसारखे इन्फ्लमेटरी पदार्थ आहारात आवर्जून घ्या. या पदार्थांमुळे सूज कमी होण्यास मदत होते आणि फुफ्फुसांचे काम सुरळीत चालण्यास याचा चांगला उपयोग होतो. 

Web Title: Lungs Cancer Causes : Lungs Cancer Causes by Dr. Shriram Nene Connection Of Lungs Cancer And Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.