Lokmat Sakhi >Health > गुडघे ठणकतात-कंबर दुखते? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाडं; फिट दिसाल

गुडघे ठणकतात-कंबर दुखते? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाडं; फिट दिसाल

Health Benefits Of Moringa Calcium : शेवग्यात क्लोरोजेनिक एसिड असते जे खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:53 PM2024-09-21T12:53:47+5:302024-09-22T12:29:48+5:30

Health Benefits Of Moringa Calcium : शेवग्यात क्लोरोजेनिक एसिड असते जे खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.

Major Health Benefits Of Moringa Calcium : Health Benefits Of Moringa Calcium | गुडघे ठणकतात-कंबर दुखते? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाडं; फिट दिसाल

गुडघे ठणकतात-कंबर दुखते? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाडं; फिट दिसाल

शेवगा (Moringa) ही एक कॉमन भाजी आहे. भारतभरातील लोक आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. खासकरून साऊथ इंडियन घरांमध्ये शेवग्याच्या शेंगा आवडीने खाल्ल्या जातात. या भाजीत  कॅल्शियम, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, व्हिटामीन   ई, प्रोटीन्स, फायबर्स असतात. शेवगा कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही. यात शेंगा आणि पानांचा समावेश असतो. (Health Benefits Of Moringa Calcium)

शेवग्याच्या शेंगाचे सेवन केल्यानं रोगप्रतिकारकशक्ती वाढते. यात एंटीफंगल, एंटी व्हायरल आणि एंटीडिप्रेसेंट गुण असतात. तुम्ही याची पानं, चूर्ण किंवा शेंगा खाऊ शकता. हार्ट आणि डायबिटीसच्या रुग्णांसाठी शेवगा फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते  ज्यामुळे एनिमियाचा त्रास दूर होतो. 

आयुशक्तीच्या रिपोर्टनुसार शेवग्यामध्ये व्हिटामीन सी, व्हिटामीन ए, कॅल्शियमने परिपूर्ण मोरींगा केसांना पोषक तत्व प्रदान करते. एका अभ्यासानुसार मोरींगामध्ये संत्र्याच्या तुलनेत ७ पट जास्त व्हिटामीन सी असते. गाजराच्या तुलनेत १० टक्के जास्त व्हिटामीन ए असते. ही सर्व तत्व शरीर निरोगी ठेवण्यासाठी  महत्वाची असते. ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते.

 इम्यूनिटी वाढेल

शेवग्याची पानं चावून  खाल्ल्यानं इम्यूनिटी वाढते. याच्या पानांमध्ये फायबटोन्युट्रिएटंस् असतात जे इम्यून सिस्टीम चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

एनर्जी भरपूर मिळते

शेवग्याची पानं खाल्ल्यानं खाल्ल्यानं शरीराला एनर्जी मिळेल ज्यामुळे थकवा  दूर होईल आणि  आयर्नने परिपूर्ण शेवग्याच्या पानांच्या सेवनानं थकवा, कमकुवतपणा दूर होईल.

हाडं मजबूत होतात

मोरिंगाच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर असते. ज्यामुळे हाडं मजबूत आणि हेल्दी होतात. शेवग्याच्या पानांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी गुण असतातत ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका टळतो.
शेवग्याची पानं खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते डायबिटीसजचा धोका कमी होतो.

शेवग्यात क्लोरोजेनिक एसिड असते जे खाल्ल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते.  शेवग्याची पानं खाल्ल्यानं बॅड कोलेस्टेरॉल कमी  होते. जर तुमचं कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर रक्त वाहिन्यांमध्ये क्लॉटींग उद्भवू शकते आणि हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो.
 

Web Title: Major Health Benefits Of Moringa Calcium : Health Benefits Of Moringa Calcium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.