Lokmat Sakhi >Health > सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी पडतात? डॉक्टर सांगतात त्या मागचं खरं कारण 

सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी पडतात? डॉक्टर सांगतात त्या मागचं खरं कारण 

Health Tips For Constant Cold And Cough In Kids: सतत सर्दी- खोकला होऊन मुलं आजारी पडत असतील तर असं का होतं, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा बघाच..(home remedies to treat cold and cough in kids)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 04:58 PM2024-11-16T16:58:49+5:302024-11-16T17:00:33+5:30

Health Tips For Constant Cold And Cough In Kids: सतत सर्दी- खोकला होऊन मुलं आजारी पडत असतील तर असं का होतं, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा बघाच..(home remedies to treat cold and cough in kids)

major reason for constant cold and cough to kids, home remedies to treat cold and cough in kids | सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी पडतात? डॉक्टर सांगतात त्या मागचं खरं कारण 

सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी पडतात? डॉक्टर सांगतात त्या मागचं खरं कारण 

Highlights४ तुळशीची पाने, २ लवंग, २ वेलची आणि चिमूटभर हळद हे पदार्थ टाकून काढा करावा आणि तो मुलांना प्यायला द्यावा.

हल्ली बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो की लहान मुलांना सारखं सर्दी- खोकला, ताप येणे असा त्रास होत असतो. वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी त्याचा सगळ्यात आधी परिणाम मुलांवर होतो आणि मुलं सर्दी खोकला होऊन आजारी पडतात. यानंतर मग त्यांना डॉक्टरकडे नेलं जातं आणि अँटीबायोटिक्सचा हेवी डोस दिला जातो. वारंवार अशी औषधं घेणं मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. म्हणूनच सर्दी- खोकला होऊन मुलं सतत आजारी का पडतात आणि त्यावर काय उपाय करावा (major reason for constant cold and cough to kids), याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही विशेष माहिती एकदा बघाच...(home remedies to treat cold and cough in kids)

 

सर्दी-खोकला होऊन मुलं सतत आजारी का पडतात?

सारखी सर्दी होऊन मुलं सतत आजारी का पडतात त्या मागचं नेमकं कारण काय आणि त्यावर काय उपाय करावा, याविषयीची माहिती डॉक्टरांनी pristinecharity_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

रात्री गारेगार थंडीत प्या गरमागरम सूप! हिवाळ्यात ताकद देणारे ५ सूप, पाहा रेसिपी-उबदार आणि चविष्ट

यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की जर मुलांना सतत सर्दी खोकला होत असेल तर याचं एकमेव कारण म्हणजे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमी आहे. त्यामुळे वातावरणात झालेला थोडासा बदलही त्यांना सहन होत नाही आणि ते आजारी पडतात. हल्ली मुलांचा अभ्यासाचा ताण खूप वाढला आहे. त्याचबरोबर शारीरिक हालचालीही कमी झाल्या आहेत. बऱ्याचदा मुलांचा आहारही व्यवस्थित नसते. त्याचा परिणाम त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. त्यामुळे सगळ्यात आधी पालकांनी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले आहेत. ते उपाय नेमके कोणते ते पाहा.

 

लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाय

१. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी ४ तुळशीची पाने, २ लवंग, २ वेलची आणि चिमूटभर हळद हे पदार्थ टाकून काढा करावा आणि तो मुलांना प्यायला द्यावा. यामुळे सर्दीचा त्रास तर कमी होतोच, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेवर सूज येते- पुरळ आल्यासारखं दिसतं? ३ उपाय- अजिबात त्रास होणार नाही

२. आल्याचा रस आणि गूळ हे दोन पदार्थ एकत्र करून मुलांना त्याचं चाटण द्यावं. यामुळेही सर्दी- खोकला कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

३. याशिवाय मुलांचा आहार व्यवस्थित आहे का, ते पुरेसं पाणी पित आहेत का तसेच स्वच्छतेची काळजी घेत आहेत का या गोष्टी तपासणंही गरजेचं आहे. 


 

Web Title: major reason for constant cold and cough to kids, home remedies to treat cold and cough in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.