Join us   

..आणि अचानक मला रडूच आलं! सुधा मूर्ती सांगतात ‘त्या’ अवघड दिवसांची अस्वस्थ गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 4:57 PM

Sudha Murty And Her Menopause: प्रत्येकीच्या आयुष्यात हा टप्पा येतोच.. त्याच नकोनकोशा वाटणाऱ्या मेनोपॉजविषयी सांगत आहेत सुधा मुर्ती.....

ठळक मुद्दे सुधा मुर्ती म्हणाल्या की मेनोपॉजमुळे अस्वस्थ होशील, तेव्हा तुझं काम आणखी जास्त वाढव, असं त्यांना वडिलांनी सांगितलं होतंच. त्यानुसार त्यांनी त्या काळात त्यांच्या दिनक्रमात बदल केला.

कळत- नकळत्या वयात पाळी येते, तेव्हा ती नकोशीच वाटत असते. नंतरही दर महिन्यात पाळीचा आपण कायमच दु:स्वास करतो. वय वाढतं आणि ती हळूहळू साथ सोडू लागते. एक दिवस ती कायमची जाणार हे कळतं आणि मग आपण घाबरतो. कदाचित पहिल्यांदाच आयुष्यात तिने जाऊ नये, असं आपल्याला वाटतं. कारण तिच्या जाण्याने आपल्या शरीरात बदल होतात, त्वचेवर सुरकुत्या येतात, वजन वाढतं, अस्वस्थ होतं... थोडक्यात सांगायचं तर वार्धक्याची चाहूल लागते. तीच तर नेमकी नकोशी असते. मनाची ही घालमेल आणि हार्मोन्सच्या बदलामुळे होणारे शारिरीक त्रास यामुळे अनेकींना मेनोपॉजचा काळ खूप कठीण जातो. सुधा मुर्तींनी (Sudha Murty) या काळात स्वत:ला कसं सांभाळलं, मेनोपॉज कसा हॅण्डल केला? याचविषयी त्या सांगत आहेत मेनोपॉजच्या ( Menopause) उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकीसाठी महत्वाचं काहीतरी...

 

सुधा मुर्ती यांच्या मेनोपॉजविषयीच्या मुलाखतीचा छोटासा भाग Brut India या फेसबूक पेजवरून व्हायरल करण्यात आला आहे. यामध्ये सुधा मुर्ती यांनी स्वत:चा मेनोपॉजचा अनुभव सांगितला.

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

त्या म्हणाल्या की त्यांचे वडील स्त्रीरोग तज्ज्ञ होते. त्यामुळे जसं त्यांनी पाळी येताना काय होतं याची माहिती दिली होती, तशीच पाळी जाताना काय होत असतं, हे ही सांगितलं हाेतं. त्यामुळे त्यांच्या मेनोपाॅजसाठी त्या पुर्णपणे तयार होत्या. वय वाढणार, त्वचेवर सुरकुत्या येणार, गालांवर बटरफ्लाय दिसू लागणार, मूड स्विंग वाढणार हे सगळं त्यांना ठाऊक होतं आणि त्यावरचे उपायही माहिती होती. तेच उपाय त्यांना त्यांचा मेनोपॉजचा काळ सुसह्य करण्यासाठी उपयुक्त ठरले...

 

सुधा मुर्तींनी कसा स्वीकारला त्यांचा मेनोपॉज?

सुधा मुर्ती म्हणाल्या की मेनोपॉजमुळे अस्वस्थ होशील, तेव्हा तुझं काम आणखी जास्त वाढव, असं त्यांना वडिलांनी सांगितलं होतंच. त्यानुसार त्यांनी त्या काळात त्यांच्या दिनक्रमात बदल केला. रोजचं वॉकिंग, व्यायामाचा वेळ वाढवला.

कुंडीतल्या रोपांवर कधीच किड पडणार नाही, घरीच तयार करा १०० टक्के ऑर्गेनिक किटकनाशक

स्वत:च्या आवडीच्या कामांमध्ये त्या जास्तीतजास्त गुंतून राहू लागल्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वयाचा हा टप्पा त्यांनी आनंदाने स्विकारला. त्या म्हणतात की मेनोपॉजमुळे जेव्हा तुमचा मूड खूप डाऊन असेल तेव्हा सगळ्यात आधी तुमच्या आवडीचं काम, तुमचा छंद हातात घ्या, पुस्तक वाचा, चित्रपट बघा आणि आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा. जेणेकरून तुम्ही त्या विचारांपासून दूर जाल आणि मेनोपॉजचा काळ सोपा होईल.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्यसुधा मूर्ती