Join us   

हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे काय? मेनोपॉजचा त्रास या थेरपीने खरंच नक्की कमी होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2024 3:24 PM

Know What is Harmon Replacement Therapy : नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाची वेळीच माहिती घ्यायला हवी...

मेनोपॉज हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर महिलांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल होतात. मासिक पाळी थांबण्याचा काळ इतकेच आपल्याला मेनोपॉजबद्दल माहित असते. पण या काळात महिलांच्या मनाचीही मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू असतात. या सगळ्याला सामोरे जाताना शारीरिक तक्रारींबरोबरच चिडचिडेपणा, मनाची अस्वस्थता, घालमेल अशा बऱ्याच गोष्टी सुरू असतात. पण हाच मेनोपॉजचा त्रास वाचवण्यासाठी नुकतीच एक नवीन उपचारपद्धती आली आहे. या पद्धतीमध्ये महिलांच्या शरीरीतील हार्मोन्सवर काम केले जाणार असून त्यामुळे मेनोपॉजच्या काळात स्त्रियांना होणाऱ्या त्रासावर आराम मिळण्यास मदत होणार आहे. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असं या थेरपीचं नाव असून ही थेरपी नेमकी काय असते ते समजून घेऊया (Know What is Harmon Replacement Therapy)...

काय असते हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी? 

मेनोपॉजदरम्यान इस्ट्रोजन हॉर्मोनची पातळी कमी होते, ही इस्ट्रोजनची कमतरता भरुन काढण्यासाठी बाहेरुन इस्ट्रोजनचा पुरवठा केला जातो. यासाठी इंजेक्शन, गोळ्या, पॅच त्वचेवर आणि योनीमार्गात लावण्याची क्रिम असे बरेच मार्ग असतात. ज्या महिलांचे काही कारणाने गर्भाशय काढलेले आहे त्यंना इस्ट्रोजेनच्या गोळ्या देतात. पण ज्यांचे गर्भाशय व्यवस्थित आहे त्यांना इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हॉर्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात.

(Image : Google)

अशाप्रकारे बाहेरुन हॉर्मोन्सचा पुरवठा केल्यास मनोपॉजचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. पॅच ही नव्याने आलेले तंत्रज्ञान असून गोळ्या घ्यायच्या नसल्यास हे पॅच अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. हे पॅच लावणे सोपे असते तसेच यामुळे औषधांनी यकृताला होणारा त्रास कमी होतो. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होणे, अंगदुखी, थकवा यांसारखी लक्षणे दिसतात. पण या ट्रिटमेंटमुळे या त्रासांचे प्रमाण काही प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत होते.   

डॉ. शिल्पा चिटणीस सांगतात...

मेनोपॉजनंतर महिलांचा उत्साह, ऊर्जा, आनंद कमी होण्याची शक्यता असते. पण या थेरपीमुळे हे सगळे टिकून राहण्यास मदत होते. स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्सची अतिशय महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांचे शरीर आणि मन उत्तम पद्धतीने कार्यरत राहण्यासाठी हॉर्मोन्सचे कार्य चांगले असणे गरजेचे असते. पाश्चिमात्य देशात या थेरपीचे प्रमाण जास्त असून आता भारतासरख्या देशातही ही थेरपी उपलब्ध आहे. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन महिलांनी आवश्यकतेनुसार या थेरपीचा उपयोग करायला हवा.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समासिक पाळी आणि आरोग्य