Lokmat Sakhi >Health >Menopause > 'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

Sudha Muthy Talks About Periods : पिरिएड्स सुरू  झाल्यानंतर आणि बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात काय बदल होतात याचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत  महिलांना कल्पना नसते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:49 PM2024-09-17T21:49:50+5:302024-09-17T22:36:22+5:30

Sudha Muthy Talks About Periods : पिरिएड्स सुरू  झाल्यानंतर आणि बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात काय बदल होतात याचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत  महिलांना कल्पना नसते.

Sudha Muthy Talks About Periods And Prepared Husband Narayan Murthy For Her Menopausal Mood swings | 'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव

समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मेनोपॉझबाबत मोकळेपणानं चर्चा केली आहे. सुधा मूर्तींनी सांगितले की जेव्हा त्या २२ ते २३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे गायनॅकोलॉजिस्ट वडील डॉ. आर, एच कुलकर्णी यांनी त्यांना मेनोपॉजबद्दल सांगितले. आपल्या मोठ्या होत असलेल्या मुलीला त्यांनी पिरिएड्सबद्दलही सांगितले होते. (Sudha Muthy Talks About Periods And Prepared Husband Narayan Murthy For Her Menopausal Mood swings)

पिरिएड्स सुरू  झाल्यानंतर आणि बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात काय बदल होतात याचा मनावर आणि शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत  महिलांना कल्पना नसते. अशा स्थितीत सुधा मूर्ती यांनी परिएड्स आणि मेनोपॉझचा सांगितलेला अनुभव हा महिलांबरोबरच पुरूषांसाठीही वाचण्यासारखा आहे जेणेकरून ते आपली आई, बहिण, पत्नी  आणि मैत्रिणीच्या समस्यांना समजू शकतील.  त्यांचा कठीण काळ सोपा होण्यास मदत होईल. 

सुधा मूर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांच्या वडीलांनी नेहमीच त्यांच्याशी एखाद्या मित्राप्रमाणे संवाद साधला. जेव्हा सुधा  मी वयात येऊ लागले तेव्हा त्यांनी मला परिएड्सबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की आता तुझ्या शरीरात बदल व्हायला सुरूवात होतील. अशा स्थितीत हॉर्मोनल बदलांमुळे उद्भवते. 


हॉर्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे तुमची स्किन आता ग्लो करेल  आणि तुला सतत आरसा पाहण्याची इच्छा होईल. पण तू मासिक पाळीला अजिबात घाबरू नकोस ही स्थिती प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येते. मासिक पाळी ही अपविज्ञ नसते. हे फक्त हॉर्मोन्समधील बदल असतात. सुधा मूर्ती यांच्या वडीलांनी आपल्या लेकींना  चांगलं संस्कार दिले.

उपमा गचका होतो? रव्याचा उपमा मऊ-मोकळा करण्याची खास रेसिपी, लग्नात करतात तसा उपमा करा घरीच

सुधा मूर्ती यांच्या पहिलांनी त्यांना वयाच्या २२ ते २३ मध्येच मेनोपॉजबद्दल माहिती दिली होती. त्यांना सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल की पिरिएड्स येणार नाहीत. परिएड्स येणं बंद झालं म्हणजे कोणता आजार झाला असं नाही. हे फक्त हॉर्मोनल बदलांमुळे होते. 

कितीतरी शॅम्पू बदलले-केस वाढेचना? डॉक्टर सांगतात सकाळी १ काम करा, लांबसडक होतील केस

वाढत्या वयात महिलांनी शरीरात  होणाऱ्या बदलांचा स्वीकार करायला हवा. त्वचेत होणारे बदल, वाढतं वजन याला अजिबात घाबरू नये. जेव्हा रडण्याचं मन होते तेव्हा स्वत:ला इतर कामांमध्ये व्यस्त ठेवा. त्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल.

जेव्हा सुधा मूर्ती मेनोपॉझमधून जात होत्या, तेव्हा त्यांची दोन्ही मुले घरापासून दूर अमेरिकेत शिकत होती. जेव्हा सुधा अचानक आपल्या मुलांची आठवण करून रडू लागत्या तेव्हा तिला स्वतःलाच आश्चर्य वाटायचे की असे का होत आहे. मुलं दूर शिकायला का गेली आहेत, पती नारायण मूर्तींना पत्नीच्या रडण्याचे कारण कळत नव्हते. जेव्हा सुधा मूर्तींना त्यांनी विचारलं तेव्हा कळलं की मेनोपॉझमुळे हे होत आहे.

Web Title: Sudha Muthy Talks About Periods And Prepared Husband Narayan Murthy For Her Menopausal Mood swings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.