Hot flashes म्हणजे अचानकच छातीत, चेहर्यावर किंवा मानेच्या भागात गरम झळा आल्यासारखं वाटणं. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीच्या शरीरात होणार्या बदलांचं एक लक्षण म्हणजे Hot flashes.
लक्षणं कोणती?
- शरीराचं तापमान अचानक वाढल्यामुळं शरीर लालसर होतं.
- धडधड अचानक वाढते.
- घामेघूम व्हायला होतं.
- शरीरभर झळा येऊन गेल्यानंतर अचानक थंडी वाजू लागते.
कारणं काय?
- पुनरूत्पादनासाठी प्रेरक ठरणार्या हार्मोन्समध्ये घट होणं.
- शरीराचं तापमान वाढण्यातून संवेदनशीलता खूप वाढते.
- धूम्रपान हे ही एक कारण.
- स्थूलपणा वाढण्यातून हे घडतं.
- अस्वस्थता
- ताणतणाव
हॉट फ्लशेशमुळं या गुंतागुंती होऊ शकतात!
- रात्रीच्यावेळी अनुभवास येणार्या हॉट फ्लशेशच्या अनुभवामुळे विस्मरणाचा रोग जडतो. तो काळजी करण्याजोगा असतो.
- हृदयरोगाचा धोका वाढतो.
- हाडांमधील खनिजांमध्ये घट होऊन त्याचे विपरित परिणाम होतात.
हा त्रास टाळण्यासाठीचे उपाय
- आजूबाजूचं वातावरण थंड व उल्हासित ठेवणं.
- संतुलित व पोषक आहार घेणं.
- खूप गरम व मसालेदार अन्न, कॅफिनचं प्रमाण वाढवणारी पेयं, मादक पेयं या गोष्टी टाळाव्यात.
- मन शांत ठेवणं.
- धूम्रपान टाळणं.
- रोजच्यारोज भरपूर व्यायाम करणं.
- बॉडी बीएमआय योग्य राखणं. आपलं वजन आपली उंची यांचं संतुलन ठेवणं.
Hot flashesचा त्रास प्रचंडच वाढल्याचं जाणवत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही हिताचं. ते अँटिडिप्रेसंट किंवा हार्मोनल थेरपीचा उपचार सुचवू शकतात. लक्षणांप्रमाणे योग्य तो उपाय तज्ज्ञांकडून घेतला तर त्रास संपतो हे मात्र खरं.