स्त्रियांचा रजोनिवृत्तीचा काळ सुरू असतो तेव्हा आणि त्यानंतर त्यांना ‘लॉस ऑफ लिबिडो’ या स्थितीचा अनुभव येतो. म्हणजे असं की एरवी लैंगिक संबंधांबद्दल वाटणारं आकर्षण, इच्छा असं सगळंच मागं पडतं. यात रूची वाटेनाशी होते. रजोनिवृत्तीच्या टप्प्यात असणार्या स्त्रियांना फोअर प्लेतून सुद्धा उत्तेजना मिळेनाशी होते. एकूण ‘सेक्स ड्राइव्ह’ आटतो.
का होतं असं? हार्मोन्सच्या उलथापालथीमध्ये इस्ट्रोजेनची पातळी अत्यंत खालावल्यामुळं रक्तप्रवाह ड्रॉप होतो आणि त्यातून योनीभागातला ओलसरपणा कमी होतो. कोरडेपणामुळं लैंगिक संबंध करायची इच्छा राहात नाही. ‘सेक्स ड्राइव्ह’ कमी होण्याची काही कारणं 1. नैराश्य, उदासी 2. ताणतणाव 3. मूत्राशयाशी संबंधित अस्वस्थता
रजोनिवृत्तीनंतरही ‘सेक्स ड्राइव्ह’ शाबूत राहाण्यासाठी काय करायचं? इस्ट्रोजेनची पातळी पुन्हा आहे तशी करता येऊ शकते. रजोनिवृत्तीदरम्यान योनीभागात आलेला कोरडेपणा यातून कमी करता येतो. मेल हार्मोन आणि इस्ट्रोजेन एकत्रितपणे असलेलं अॅड्रोजेन मिळालं की स्त्रीचा लैंगिक संबंधांमधला रस परत येऊ शकतो. इस्ट्रोजेनच्या गडबडीमुळं उद्भवलेल्या समस्येवर तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणानं बोललात तर कितीतरी पर्यायी उपाय ते सुचवू शकतात. कधीकधी समुपदेशनानेही समस्या सुटण्यासाठी मदत होते.
रजोनिवृत्तीदरम्यान लैंगिक संबंधांबद्दलचा रस का आटतो? रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळं शरीरात होणार्या बदलांचा परिणाम म्हणून स्त्रीची खूप चिडचिड होते. या गोष्टीचा व अन्य गोष्टींमधील ताणतणावांचाही परिणाम होत राहातो आणि लैंगिक उत्तेजना हरवते. इस्ट्रोजेनची पातळी खालावली की रक्तप्रवाहही हळू होतो. त्यातून योनी व योनीचे ओठांसदृश दिसणारे भाग अगदी नाजूक होऊन बसतात. तिथलं आवरण पूर्वीपेक्षा पातळ होतं. स्त्रियांमध्ये मानसिक पातळीवरही या काळात प्रचंड बदल होतात. या सगळ्यांतून लैंगिक संबंधांची रूची कमी होत जाते.
लैंगिक संबंधांबद्दल रूची कमी होण्याची अन्य कारणं 1. अतिरेकी धूम्रपान 2. लैंगिक जीवन अतिशय निरूत्साही असणं 3. मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार असणं
रजोनिवृत्तीच्या काळात रोजच्यारोज मॉश्च्यरायझिंग करणं जरूरीचं असतं का? माइल्ड ल्युब्रिकंट वापरल्यानं योनीभाग मऊ आणि ओलसर राहायला मदत होते, त्यातून ‘सेक्स ड्राइव्ह’ बर्यापैकी साधला जातो. लैंगिक बाह्यांगांना म्हणजे वल्वा व अन्य भागांना हातानं मसाज करणं खूप जरूरीचं, अर्थात तेही व्हायब्रेशनद्वारे साधू शकतं. या प्रकारे काळजी घेतल्यावर योनीभागाला आलेला सैलसरपणा कमी होतो व रक्तप्रवाह सुधारतो.
‘लिबिडो’ कसा सुधारायचा? लैंगिक उत्तेजना परत मिळवायची पहिली पायरी म्हणजे त्याबद्दल मनात विचार करणं. कुठल्यातरी सिनेमाचा एखादा हवाहवासा सीन आठवणं, कुठलीतरी फँटसी मनात घोळवणं यातून लैंगिक उत्तेजना मिळवता येते.
लिबिडो परत मिळवण्यासाठी कुठला विशेष आहार आहे का? सीफूडची यासाठी मदत होते. या अन्नाने रक्तप्रवाह सुधारतो, रक्ताभिसरण वाढतं. आणखी काही खाद्यपदार्थ असे : 1. डार्क चॉकलेट्स 2. ब्ल्यू बेरीज 3. ग्रीन टी आपल्याला सेक्स ड्राइव्ह उत्तम अपेक्षित असेल तर निरोगी शरीर ओघानं आलंच. योग्य वेळी खाणं आणि चांगला व्यायाम करणं हे तर यासाठी आवश्यकच!