Join us  

अगं बाई....अचानक पिरिएड्स आलेत! अशावेळी सॅनिटरी नॅपकिन जवळ नसेल तर काय करायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 6:03 PM

Menstrual cycle Tips for women : जवळपास केमिस्ट शॉप नसेल किंवा तिथे पोहोचण्यासाठी वेळ लागणार असले तर गैरसोय होऊ नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स नसतील काय करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

ठळक मुद्देआजकाल सगळेचजण सेफ्टी म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स स्वत:सोबत ठेवत असले तरी अनेकदा असं होतं, आपल्याकडे काहीच नसतं.

दर महिन्याची पाळी येणार म्हटलं की, एक आठवडा आधीपासूनच महिलांना टेंशन आलेलं असतं. कारण तुमच्यापैकी अनेकांची  मासिक पाळी ही तारखेला न येता  काही दिवस आधी किंवा काही दिवस नंतर येते. तर काहींना एका महिन्यांत दोनदासुद्धा पाळी येते. अशावेळी कल्पना नसताना पाळी आली तर ऐनवेळी काय करायचं, काहीच सुचत नाही.

आजकाल सगळेचजण सेफ्टी म्हणून सॅनिटरी नॅपकिन्स स्वत:सोबत ठेवत असले तरी अनेकदा असं होतं, आपल्याकडे काहीच नसतं. ऑफिसमध्ये असल्यावर कोणाकडे सॅनिटनरी नॅपकिन्स असतील का, कसं मागायचं? असे अनेक विचार मुलींच्या मनात येतात. त्याचवेळी त्वरित सॅनिटरी पॅड लावले गेले नाही तर कपड्यांना डाग लागण्याची वेगळी भीती असते. जवळपास केमिस्ट शॉप नसेल किंवा तिथे पोहोचण्यासाठी वेळ लागणार असले तर गैरसोय होऊ नये म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्स नसतील काय करता येईल याबाबत सांगणार आहोत. 

कॉटन वूल

एक आयताकार  कापसाचा भाग बनवून घ्या आणि टॉयलेट पेपरनं व्यवस्थित गंडाळून घ्या. जर टॉयलेट पेपर नसेल तुम्ही टिश्यू पेपरचा रोलसुद्धा कापसाभोवती गुंडाळू शकता.  अशा पद्धतीनं तयार केलेला पॅड तुम्ही आरामात  दोन ते तीन तास वापरू शकता.  तोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. नंतर सॅनिटरी नॅपकिन्सची व्यवस्था झाल्यावर तुम्ही हा पॅड फेकून देऊ शकता.

टॉयलेट पेपर

आपल्या बॅगेत नेहमीच टॉयलेट पेपर रोल  ठेवणं  इमरजेंसीसाठी फायद्याचं ठरतं. जर आपल्याला अचानक पिरिएड्स आले तर आपण टॉयलेट टिश्यू पेपरचे एकापेक्षा जास्त थर बनवू शकता आणि त्यास पॅडसारखे काही काळ वापरू शकता. पेपर रोलच्या मदतीने एक जाड थर बनवा, हा उपाय काही काळ आपल्या गळतीस प्रतिबंधित करण्यास मदत करेल.

वॉश क्लोथ्स

वॉश क्लेथ्स पॅड्ससाठी एक उत्तम पर्याय आहे. पहिल्या दिवशी होत असलेल्या हेवी ब्लिडिंग दरम्यान तुम्ही गळतीस प्रतिबंधित  करण्यासाठी तुम्ही काही तास याचा वापर करू शकता. याशिवाय एक प्लास्टिक शीट लावू शकता. 

मोजे

इमरजेंसी असल्यास आपण तात्पुरते पॅड म्हणून  वापरात नसलेले नवीन मोजे वापरू शकता. आपण त्यात कापूस किंवा टॉयलेट पेपर भरून वापरू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोजे सहज द्रव शोषून घेतात. म्हणूनच ते तात्पुरते पर्याय म्हणून सर्वोत्तम आहेत.

जाड कापडातील हातरुमाल

हा उपाय थोडा किचकट असू शकतो पण ट्राय करण्याआधी तुम्ही तपासून पाहायला हवं. तुम्ही ज्या पद्धतीचे हात रूमाल वापरता त्यातून द्रव पदार्थ शोषून घेतले जात असतील, तर तुम्ही आरामात तात्पुरता उपाय म्हणून  रूमाल वापरू शकता. या उपायाच्या वापरानं कपड्यांना डाग लागण्यापासून वाचता येऊ शकतं. पण लक्षात घ्या हा उपाय तुम्ही तात्तपुरता वापरू शकता चूकूनही  जास्तवेळ या उपायाचा वापर करू नका.

स्पंज फ्रब्रिक्स

अनेक घरांमध्ये किंवा गाडीत स्पंजप्रमाणे फ्रब्रिक असते. जे आरामात धुतलं जाऊ शकतं. खिडक्या, दरवाजे, लॅपटॉप साफ करण्यासाठी या  कापडाचा वापर केला जातो.  हे कापड पाणी खूप लवकर शोधून घेतं आणि लवकर खराबही  होत नाही. गैरसोय टाळण्यासाठी अशाप्रकारचं स्वच्छ कापड उपलब्ध असल्यास तुम्ही वापरू शकता. वापर करून झाल्यानंतर तुम्ही हे कापड फेकून द्या. लक्षात घ्या वरील सर्व उपाय तात्पुरते असून कोणत्याही उपायांची दीर्घकाळ वापरण्यासाठी निवड करू नका. 

टॅग्स :महिलाहेल्थ टिप्सआरोग्य