Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

Menstrual Cramp Home Remedies To Manage Pain : मासिक पाळीत पोट दुखतयं? हे चार उपाय ट्राय करा....मासिक पाळीच्या वेदना होतील कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 08:03 PM2023-06-30T20:03:40+5:302023-07-01T17:27:04+5:30

Menstrual Cramp Home Remedies To Manage Pain : मासिक पाळीत पोट दुखतयं? हे चार उपाय ट्राय करा....मासिक पाळीच्या वेदना होतील कमी...

4 Best Home Remedies to Relieve Menstrual Cramps | मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

मासिक पाळी दरम्यान कायम पोटदुखीचा त्रास होतो. अशावेळी नेमके काय उपाय करावे हे काळत नाही. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या प्रचंड वेदना कमी करण्यासाठी चटकन करता येतील असे काही घरगुती उपाय आहेत का ? 

मासिक पाळी ही नाकारता येणारी गोष्ट नाही. त्यामुळे दर महिन्यात येणाऱ्या मासिक पाळीला प्रत्येक स्त्रीला सामोरे जावेच लागते. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना अस्वस्थता आणि त्रास जाणवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. मात्र प्रत्येक स्त्रीच्या वेदना या वेगवेगळ्या असू शकतात. जर आपल्याला किंवा घरातील इतर महिलांना दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान शारीरीक आणि मानसिक वेदना होत असतील तर आपण यासाठी विविध घरगुती उपाय करु शकता. आपण खालील दिलेले चार घरगुती उपाय नक्की घरी करू शकता ज्यामुळे नक्कीच वेदनामुक्त होण्यास मदत होईल व आपल्याला तात्काळ आराम मिळेल. 

मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळी येण्याआधी पोट दुखीची समस्या अनेकांना जाणावते. याला 'पीरियड्स क्रँप्स' देखील म्हटले जाते. मासिक पाळीच्या  दरम्यान होणाऱ्या पोटदुखीमुळे अनेक वेळा थकवा जाणतो. काहींना डोकेदुखी, पाठदुखी आणि कंबरदुखीची समस्या देखील जाणावते. मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी जर कमी करायची असेल तर आपण या घरगुती टिप्स फॉलो करू शकता. मासिक पाळीच्या वेदना या नैसर्गिक असल्यामुळे आपण यावर घरगुती चटकन करता येतील असे उपाय करु शकता. मात्र हे उपाय करूनही आपल्याला असह्य वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे(4 Best Home Remedies to Relieve Menstrual Cramps).

१. हलक्या गरम पाण्याचा शेक घेणे :- पोटाच्या खालील भाग म्हणजेच ओटीपोट, पाय व पाठ शरीराचे असे भाग आहेत ज्यामध्ये साधारणत: पीरियड्स पेन होतं. या भागांना हलक्या गरम पाण्याने शेक दिल्यास मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून स्वत:चा बचाव करू शकता. गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट व कंबर शेकावी यामुळे होणाऱ्या वेदना कमी होतात. याचप्रमाणे जिऱ्याचे पाणी प्यायल्याने ओटापोटात होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून हे पाणी प्यावे यामुळे आराम पडतो.  

पिरिएड ट्रॅकर अ‍ॅप्स काय असतात? खरंच त्यांचा उपयोग करुन पाळीच्या दिवसात योग्य काळजी घेता येते का?

२. पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेट ठेवा :- नियमित २ ते ३ लीटर पाणी पिणं अत्यंत आवश्यक असतं त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या. शरीरात पाण्याची पातळी योग्य असल्याने अनेक समस्या व आजार सहज दूर होतात. पाण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो व मासिक पाळीतील वेदना कमी होतात. पाण्यात लिंबू पिळून हे लिंबूपाणी देखील आपण पिऊ शकता. याव्यतिरिक्त तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून प्या. धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. अशा विविध पद्धतीने शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.

इनरवेअर्सचा आतला भाग पांढरा -कडक कशाने होतो? कारणं आणि ४ सोपे उपाय...

३. योगा किंवा चालत-फिरत राहा :- घरात चालत व फिरत राहिल्याने व नियमित योगाभ्यास केल्याने मासिक पाळीत होणा-या वेदनांपासून आपण मुक्ती मिळवू शकता. असे काही खास योगासने देखील आहेत जी पीरियड पेन पासून आराम मिळवून देण्यास लाभदायक ठरतात. गोमुखासन, भुजंगासन आणि शीर्षासन ही अशी काही आसने आहेत ज्याद्वारे आपण वेदना कमी करण्याचा प्रयत्न करू शकता.

मासिक पाळीत झोपच येत नाही? पोटदुखी-हेवी ब्लिडिंग? ८ सोप्या गोष्टी, झोपा शांत...

४. पोटाला तेलाने मसाज करा :- गरम पाण्याने पोट शेकवण्यापूर्वी आपण नारळाच्या तेलाने पोटाला हलक्या हाताने मसाज करू शकता. तेलामध्ये आपले स्नायू रिलॅक्स करण्याची  क्षमता असते. कारण मसाज केल्यामुळे तेल आपल्या त्वचेत मुरते आणि पोटातील स्नायूंना रिलॅक्स करते. मसाजमुळे आपल्या ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळेही आपल्या ओटीपोटातील वेदना कमी होतात. मसाज करण्यासाठी आपण नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा कोणतेही त्वचेला लावायचे तेल वापरू शकता. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा पोटाला तेल लावून जोरजोरात पोटावर रगडू नये, हलक्या हातांनी गोलाकार मोशनमध्ये पोटाला मसाज करावा.

Web Title: 4 Best Home Remedies to Relieve Menstrual Cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.