Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > हिवाळ्यात मासिक पाळीत ओटीपोट खूप दुखतं? खा ४ पदार्थ; पाळीचं दुखणं होईल कमी-वाढेल ताकद

हिवाळ्यात मासिक पाळीत ओटीपोट खूप दुखतं? खा ४ पदार्थ; पाळीचं दुखणं होईल कमी-वाढेल ताकद

4 Foods That May Help Ease Your Period Cramps : थंडीत पिरीएड्सच्या वेदना दूर करण्यासाठी आवर्जून खा ४ पैकी १ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 03:26 PM2024-11-13T15:26:20+5:302024-11-13T15:27:34+5:30

4 Foods That May Help Ease Your Period Cramps : थंडीत पिरीएड्सच्या वेदना दूर करण्यासाठी आवर्जून खा ४ पैकी १ पदार्थ

4 Foods That May Help Ease Your Period Cramps | हिवाळ्यात मासिक पाळीत ओटीपोट खूप दुखतं? खा ४ पदार्थ; पाळीचं दुखणं होईल कमी-वाढेल ताकद

हिवाळ्यात मासिक पाळीत ओटीपोट खूप दुखतं? खा ४ पदार्थ; पाळीचं दुखणं होईल कमी-वाढेल ताकद

पिरीएड्समधले (Menstrual Cycle) चार दिवस महिलांसाठी फार महत्वाचे ठरतात (Periods). मासिक पाळी जवळ आल्यानंतर किंवा मासिक पाळीत पोटदुखीचा (Stomach ache) त्रास हा होतोच. इतर ऋतूच्या तुलनेत हिवाळ्यात मासिक पाळीमुळे होणारे वेदना वाढतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हिवाळ्यात पीरियड्सचा त्रास वाढू शकतो. हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने ही समस्या उद्भवू शकते. यासह तेलकट किंवा मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यानेही हा त्रास वाढू शकतो.

थंडीमुळे रक्तवाहिन्या आकसतात. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येतात. जर पिरीएड्समध्ये पोटदुखीचा त्रास आणि रक्तस्त्रावामध्ये अडथळे येऊ नये असे वाटत असेल तर, आहारतज्ज्ञ सना गिल यांनी सांगितलेल्या काही पदार्थ खाऊन पाहा. यामुळे पिरीएड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी होतील. यासह मासिक पाळीमध्ये होणारा रक्तस्त्रावात अडथळे येणार नाही(4 Foods That May Help Ease Your Period Cramps).

लिंबूवर्गीय फळे

हिवाळ्यात मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आपण लिंबूवर्गीय फळे खाऊ शकता. या ऋतूत आपण संत्री, आवळा खाऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सीयुक्त फळे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, थकवा कमी होतो आणि वेदनांपासून आराम मिळतो.

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा ४ चुका; मुलांच्या वाढीचा प्रश्न..

दालचिनी दूध

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी आपण दालचिनीचं दूध पिऊ शकता. दालचिनीमध्ये अँटिस्पास्मोडिक गुणधर्म असतात. मासिक पाळीच्या दरम्यान क्रॅम्पच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी फायदेशीर मानली जाते.

हिरव्या पालेभाज्या

हिवाळ्यात भरपूर प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खा. मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी पालक, ब्रोकोली, कोबी इत्यादी भाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी मदत होईल.

आल्याचा चहा

मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आपण आल्याचा चहा पिऊ शकता. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटदुखीचा त्रास होत नाही. परंतु, जास्त प्रमाणात आल्याचा चहा प्यायल्याने पोटात ऍसिडिटी होऊ शकते.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

हळदीचे दूध

मासिक पाळीत होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण हळदीचे दूध पिऊ शकता. दुधासोबत आपण मनुके आणि काजूही खाऊ शकता. मनुका खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते. तसेच लोहाचा चांगला स्रोत आहे. काजू खाल्ल्याने ओटीपोटाकडील स्नायू भाग मजबूत होतो. 

Web Title: 4 Foods That May Help Ease Your Period Cramps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.