Join us   

मासिक पाळी सतत अनियमित? ४ प्रकारची फळं नेहमी खा, मासिक पाळी नियमित यायला हवी तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 3:36 PM

4 Fruits to eat if you have irregular periods : दर महिन्याला मासिक पाळीची तारीख का बदलते? ‘ही’ आहेत कारणं..

अनेक महिलांना मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या असते (Menstrual Cycle). मासिक पाळीची डेट पुढे किंवा महिनाभर मासिक पाळी येत नाही (Irregular Periods). किंवा मासिक पाळी सामान्यपेक्षा जास्त किंवा कमी रक्तस्त्राव, मासिक पाळीतील दिवसांची संख्या वाढणे किंवा कमी होणे यांसारखे बदल दिसून येतात(4 Fruits to eat if you have irregular periods).

अनियमित मासिक पाळी सामान्य असते का?

एनसीबीआयच्या म्हणण्यानुसार, काही वेळेला मासिक पाळीतील बदलांमुळे शरीरात विशेष बदल दिसून येत नाही. पण जर ही समस्या नियमित किंवा जास्त प्रमाणात होत असेल तर, शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अर्थात ॲनिमियाचे लक्षण असू शकते. ज्यामुळे वंध्यत्व, ऑस्टिओपोरोसिस, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासह इतर गंभीर आजार होऊ शकतात.

जान्हवी कपूर सांगते, त्या चार दिवसात कधीकधी नाकातून रक्तस्त्राव होतो! हा त्रास महिलांना कशाने होतो?

अशा परिस्थितीत मासिक वेळेवर उपचार करणे गरजेचं आहे. पोषक आहार आणि व्यायामासह निरोगी जीवनशैली फॉलो करायला हवे. जर अनियमित मासिक पाळीची समस्या आपल्यालाही असेल तर, आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर इला यांनी सांगितलेल्या फळांचा आहारात समावेश करा.

अनियमित मासिक पाळीसाठी आयुर्वेदिक उपाय

संत्री

संत्री हे व्हिटॅमिन सी समृद्ध फळ आहे. ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होऊ शकते. व्हिटॅमिन सी समृद्ध फळांमध्ये लिंबू, किवी आणि आंबा यांचा देखील समावेश होतो. ही फळं नियमितपणे खाल्ल्याने मासिक पाळीतील अनियमितता कमी होऊ शकते.

आवळा

अनियमित मासिक पाळी असलेल्या महिलांना आवळा खाण्याचा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात. आवळ्यामध्ये असलेले औषधी गुणधर्म नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळीतील अनियमितता दूर करण्यास मदत करतात.

डाळिंब

डाळिंब महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे फळ मासिक पाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, गर्भाशयाचा असामान्य आकार इत्यादी समस्यांपासून आराम देऊ शकते. आपण नियमित एक ग्लास डाळींबाचे ज्यूस पिऊ शकता.

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात म्हणून डॉक्टरची बिलं भरता? फक्त ४ गोष्टी करा, हाडं होतील बळकट

अननस

अननसात ब्रोमेलेन नावाचे एन्झाइम असते. हे गर्भाशयाचे अस्तर बंद करण्यास मदत करते. ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते. हे फळ लाल आणि पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन देखील वाढवते, ज्यामुळे रक्त प्रवाहास मदत होते.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्स