मासिक पाळी ही प्रत्येक महिन्यात येणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्यतः २८ ते ३० दिवसांनी महिलांच्या मासिक पाळीची सायकल रिपीट होत असते. साधारणपणे मासिक पाळीत ५ ते ७ दिवस रक्तस्त्राव होतो. रक्तस्त्राव व्यवस्थित योग्य प्रमाणात होऊन मासिक पाळी दर महिन्याला येत असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे. परंतु काहीजणींना या दर महिन्याला येणाऱ्या पाळीचा फार त्रास असतो. बऱ्याच महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटदुखी, पाठदुखी, वेदना होणे, रक्तस्त्राव जास्त किंवा कमी होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो(4 seeds for scanty periods).
पाळी दरम्यान फक्त २ ते ३ दिवसच रक्तस्त्राव होणे त्यानंतर अंगावरुन काहीही न जाणे ही पाळीच्या (seeds increase period flow) अनेक समस्यांपैकी एक सर्वात मोठी समस्या आहे. ही एक गंभीर समस्या असू शकते. मासिक पाळीचा प्रवाह सामान्यपेक्षा जास्त किंवा खूप कमी असणे योग्य नाही. जर तुमच्या मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होत नसेल किंवा तो १ ते २ दिवसात थांबला असेल तर तुमच्या आहारात या ४ बियांचा समावेश करणे तुमच्या मासिक पाळीच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. दिल्ली यूनिवर्सिटीमधून न्यूट्रिशन्स विषयांत मास्टर्स केलेल्या डॉक्टर डाइटिशियन मनप्रीत यांनी या बद्दल अधिक माहिती दिली आहे(How to Use Seeds for Irregular Periods).
मासिक पाळी दरम्यान ब्लड फ्लो सुरळीत करण्यासाठी कोणत्या बिया खाव्यात ?
१. अळशी :- पिरेड्स फ्लो योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित करण्यासाठी अळशीच्या बियांचा आपल्या रोजच्या डाएट मध्ये समावेश करावा. अळशीच्या बिया कोरड्या हलकेच भाजून घ्याव्यात. त्यानंतर या भाजलेल्या बियांची मिक्सरमध्ये वाटून बारीक पूड करुन घ्यावी. ही बारीक पूड पाण्यांत मिक्स करुन दिवसभरातून एकदा हे अळशीच्या बियांचे पाणी प्यावे. अळशीच्या बिया खाल्ल्याने शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. परंतु, हे जास्त प्रमाणात खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासाठीच अळशीच्या बिया योग्य प्रमाणातच खाव्यात.
२. सूर्यफुलाच्या बिया :- मासिक पाळीत रक्तस्त्राव कमी होत असेल तर सूर्यफुलाच्या बिया खाणे फायदेशीर ठरेल. आपल्या रोजच्या जेवणात किंवा फळं खाताना सूर्यफुलाच्या बिया फळांवर भुरभुरवून घ्याव्यात. या बिया शरीरातील हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात.
मासिक पाळीत कपड्यांवर डाग पडलेत ? ७ सोपे उपाय, डाग आणि दुर्गंधी गायब...
३. तीळ :- पिरेड्समध्ये ब्लड फ्लो नियमन करण्यासाठीही तीळ प्रभावी आहेत. या बियांमध्ये लिग्नॅन्स असतात. या बिया हार्मोनल असंतुलन , जळजळ, पुरळ आणि मूड स्विंग कमी करतात . या बियांचा आहारात समावेश केल्यास गर्भाशयाचे आकुंचन वाढण्यास मदत होते आणि प्रवाह वाढू शकतो.
४. चिया सीड्स :- चिया सिड्समध्ये असलेले गुणधर्म मासिक पाळीसाठी आवश्यक हार्मोन्स आपल्या शरीराला मिळवून देण्यास मदत करतात. या बियांचा आहारात समावेश केल्याने मासिक पाळी नियमित होते आणि प्रवासुद्धा नियमित होतो. चिया सिडचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ब्लड फ्लो सुरळीत होण्यास मदत मिळते.
महिलांनी निरोगी राहण्यासाठी त्यांची मासिक पाळी योग्य वेळी येणे गरजेचे असते. जर तुम्हाला मासिक पाळीदरम्यान फक्त १ ते २ दिवसच रक्तस्त्राव होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.