Join us   

पाळीमध्ये खूपच पोट दुखतं? अंशुका परवानी सांगतात झोपून राहण्याऐवजी करा ५ व्यायाम .. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2022 8:13 AM

How to Get Relief From Menstrual Pain: पाळी सुरू असताना जर काही व्यायाम केले तर पोटदुखी नक्कीच कमी होऊ शकते, असं करिना कपूर, आलिया भट यांच्यासारख्या सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) सांगते आहे.

ठळक मुद्दे पोट दुखायला लागलं की काहीच हालचाल न करता नुसतं पडून रहावं असं वाटतं. पण असं झोपून राहिल्याने पोटदुखी कमी होणार नाही.

मासिक पाळीमध्ये अनेक जणींना खूपच त्रास होतो. या काळात काही जणींचं पोट एवढं जास्त दुखतं की एक- दोन दिवस शाळा- कॉलेज किंवा ऑफिसला सुट्टी घेऊन घरी रहावं लागतं. पोट दुखायला लागलं की काहीच हालचाल न करता नुसतं पडून रहावं असं वाटतं. पण असं झोपून राहिल्याने पोटदुखी कमी होणार नाही. पोटदुखी थांबवायची असेल तर त्यासाठी काही व्यायाम करा (5 Yogasana to reduce menstrual cramps), असा सल्ला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी दिला आहे. हे काही व्यायाम केले तर नक्कीच पाळीतली पोटदुखी कमी हाेऊ शकते. ( How to get relief from menstrual pain?)

पाळीमध्ये होणारी पोटदुखी कमी करणारे व्यायाम १. बटरफ्लाय पोज यासाठी जमिनीवर किंवा बेडवर ताठ बसा. दोन्ही तळपाय तुमच्या समोर एकमेकांना जोडून ठेवा.

लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 

दोन्ही पायांच्या गुडघ्यांखाली एखाद्या टॉवेलची किंवा एखाद्या बेडशीटची गुंडाळी ठेवा. एक ते दिड मिनिटे या अवस्थेत बसून रहा.

 

२. फॉरवर्ड पोज हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय दोन्ही दिशांना पसरवून लांब करा. दोन्ही पायांतलं अंतर तुम्हाला जेवढं शक्य होईल, तेवढं जास्त ठेवा.

ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

तुमच्या समोरच्या भागात एकावर एक दोन उशा किंवा चादरीची गुंंडाळी ठेवा. या गुंडाळीवर तुमच्या दोन्ही हातांचे कोपरे ठेवून कंबरेतून पुढे वाका. या अवस्थेत एक ते दिड मिनिटे बसा. 

 

३. मलासन पाळीदरम्यान मलासन केल्यानेही पोटदुखी कमी होते. शक्य असल्यास भिंतीला टेकून हे आसन करा म्हणजे जास्त त्रास होणार नाही.

 

४. भिंतीला पाय लावणे जमिनीवर पाठीवर झोपा. दोन्ही पाय वर करून सरळ रेषेत भिंतीला लावा. दोन्ही हात दोन्ही बाजूंनी सरळ रेषेत पसरवून ठेवा. ही आसनस्थिती काही मिनिटे टिकवून ठेवा.

खडीसाखर खाण्याचे जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात ॲसिडिटीसह ३ आजारांवर ठरेल गुणकारी

५. रिक्लाईन बटरफ्लाय पोज दोन्ही तळपाय एकमेकांना जोडा आणि शरीर मागे घेऊन पाठीवर झोपा. काही मिनिटे ही आसनस्थिती टिकवून ठेवा.   

टॅग्स : आरोग्यव्यायामयोगासने प्रकार व फायदेमासिक पाळी आणि आरोग्य