Join us   

मासिक पाळीत पोट दुखते-पायात गोळे येतात? ३ गोष्टी टाळा, क्रॅम्प होतील चटकन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2024 8:03 PM

6 Foods to Eat (and Some to Avoid) During Your Period : मासिक पाळी सुरु असताना काय खावं काय अजिबात खाऊ नये?

मासिक पाळीच्या काळात स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल होणं कॉमन आहे (Menstrual Cycle). ज्यामुळे स्नायू दुखणे, डोकेदुखी, पोटदुखी, थकवा, चिडचिड राग, नैराश्य, ओटीपोटात दुखणे, मसल क्रॅम्प्स, मांड्या दुखणे असा त्रास जाणवतो (Health Tips). या दिवसात शरीर हार्मोन तयार करतात, ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते व गर्भाशयाचे अस्तर बाहेर टाकण्यास मदत करते (Periods). या आकुंचनामुळे स्त्रियांना क्रॅम्प्स जाणवतात.

या वेदनेमुळे महिलांना जास्त त्रास होतो. हार्मोनल बदल हे आहाराशी संबंधित देखील असतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान खाण्याबाबत काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. मासिक पाळी दरम्यान, काय खावं काय टाळावं? पाहूयात(6 Foods to Eat (and Some to Avoid) During Your Period).

मासिक पाळी दरम्यान काय खावे?

ताजी फळे

ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटनुसार, ताज्या आणि हिरव्या फळांमध्ये जीवनसत्त्वे असतात. यासह अँटिऑक्सिडंट असतात. मासिक पाळीत फळं खाणं फायदेशीर ठरतं. यासह लिंबू पाणी आणि नारळ पाणी पीत राहा. ज्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासही मदत होईल.

मधुमेह होऊ नये म्हणून काय करावं? ३ गंभीर चुका वेळीच टाळा; अन्यथा वजन वाढेल आणि..

आलं

मासिक पाळीदरम्यान आलं खाणं फायदेशीर ठरू शकतं. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे स्नायूंचे दुखणे कमी करण्यास मदत करतात. पीरियड्सदरम्यान, आपण आल्याचा चहा देखील पिऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या

मासिक पाळीमध्ये हिरव्या पालेभाज्या खाणं खूप फायदेशीर मानले जाते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील ॲनिमियासारख्या समस्या कमी होतात. यासह अशक्तपणाही कमी होतो. भाज्यांमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीराला तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात.

मासिक पाळी दरम्यान काय खाऊ नये?

साखर

मासिक पाळीच्या दरम्यान साखर कमी प्रमाणात खायला हवी.साखर खाल्ल्याने शरीरात अचानक ऊर्जा वाढते. शिवाय मूड स्विंग देखील होते.  त्यामुळे साखर कमी किंवा टाळणं योग्य ठरू शकतं.

मसालेदार पदार्थ

मासिक पाळीच्या काळात मसालेदार पदार्थ खाणं टाळावे. मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात. पीरियड्स दरम्यान या समस्या टाळण्यासाठी मसालेदार अन्नापासून दूर राहणे उत्तम.

वजन कमी करायचं म्हणून साखर बंद करुन गुळ किंवा मध खाता? आहारतज्ज्ञ सांगतात, फायद्याचं नेमकं काय..

कॉफी

मासिक पाळीदरम्यान, कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये. चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स जास्त प्रमाणात प्यायल्याने मासिक पाळीच्या दरम्यान वेदना वाढू शकतात. त्यामुळे कॉफी कमी किंवा टाळणं योग्य ठरू शकतं. 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यहेल्थ टिप्सअन्न