Join us

अनन्या पांडेने सांगितला पहिल्यांदा पाळी आली तेव्हाचा भीतीदायक अनुभव, म्हणाली मला काहीच.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 16:47 IST

Actress Ananya Panday Revealed About Her First Period: पहिल्यांदा पाळी येते तेव्हा जवळपास प्रत्येक मुलीचीच जी अवस्था होते, तसाच काहीसा अनुभव अभिनेत्री अनन्या पांडेलाही आला होता..

ठळक मुद्दे शाळा संपून ती घरी गेली तेव्हाही तिने तिच्या आईला याविषयी काहीच सांगितलं नाही. कारण तिला वाटत होतं की हे जे सगळं होत आहे त्यात तिचीच काहीतरी चूक आहे. 

साधारण मुलगी १४- १५ वर्षांची झाली की तिच्या शरीरात बराच बदल झालेला जाणवतो. या बदलांची सुरुवात जेव्हा व्हायला लागते तेव्हाच आपल्यामध्ये काहीतरी वेगळं होत आहे हे प्रत्येक मुलीला जाणवायला लागलेलं असतं. त्यानंतर एखाद्या दिवशी जेव्हा अचानक पाळी येते तेव्हा मात्र त्याविषयी काहीच माहिती नसलेली मुलगी भांबावून जाते. घाबरून जाते. अचानक हे सगळं काय सुरू झालं असा प्रश्न तिला पडतो. असाच प्रश्न अभिनेत्री अनन्या पांडे हिलासुद्धा पडला होता. त्यावेळी तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं, याविषयीची माहिती तिने न्यूज१८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.(Actress Ananya Panday Revealed About Her First Period)

 

अनन्या म्हणते की ज्यावेळी ती पाळी येण्याच्या वयात होती त्यावेळी तिला मासिक पाळी काय असते, कशी सुरू होते याविषयी काहीच माहिती नव्हतं. तिला घरातूनही या गोष्टींची कल्पना देण्यात आलेली नव्हती आणि शाळेतल्या मैत्रिणींकडूनही काहीच कळालेलं नव्हतं.

आलिया भट म्हणते- मी नेहमीच कपडे रिपिट करते कारण.... बघा तिचं कारण तुम्हाला पटतंय का

त्यामुळे असं काही होत असतं आणि ते अगदी नॉर्मल आहे, याची तिला कल्पनाच नव्हती. अनन्या म्हणाली की तिला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली तेव्हा ती शाळेत होती. काहीतरी वेगळं होत आहे हे तिला समजलं; पण तिने ते कोणालाच सांगितलं नाही. शाळा संपून ती घरी गेली तेव्हाही तिने तिच्या आईला याविषयी काहीच सांगितलं नाही. कारण तिला वाटत होतं की हे जे सगळं होत आहे त्यात तिचीच काहीतरी चूक आहे. 

 

पण शेवटी आईला, आजीला हे सगळं कळालं. त्यानंतर जे झालं त्याबद्दल त्यांनी जो आनंद व्यक्त केला, ती वयात आली म्हणून तिला गिफ्ट दिले यानंतर कुठे ती थोडी सावरली. काय होतं आहे, काय झालं आहे हे तिला थोडं थोडं समजू लागलं.. खूप मुलींचं असंच होतं.

मुलांना जेवताना टीव्ही, मोबाईल लागतोच? ३ गोष्टी करा, स्क्रीन बघत जेवण्याची सवय कायमची सुटेल 

आईला वाटत असतं की आपली मुलगी खूप लहान आहे, तिला हे सगळं कसं सांगावं त्यामुळे अवघडल्यासारखं वाटल्याने आई मुलीला काहीच सांगत नाही. हल्ली मुलींना शाळांमधून मात्र मासिक पाळीविषयीची माहिती दिली जाते. त्यामुळे त्याविषयी थोडं तरी ज्ञान त्यांना असतं. त्यालाच जोडून आईनेही मुलींशी मोकळं बोलायला हवं. शरीरात होणारा हा बदल किती आवश्यक आहे हे त्यांना समजावून सांगावं. जेणेकरून त्यांना पाळीविषयी घृणा वाटणार नाही. स्वत:च्या शरीरात होणारा हा बदल त्या आनंदाने समजवून घेऊ शकतील..

 

टॅग्स : अनन्या पांडेमासिक पाळी आणि आरोग्यसोशल व्हायरल