Join us   

श्रीदेवीची खास आठवण सांगताना जान्हवी कपूर म्हणाली- मी वयात आले होते, तरीही आई मला......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 12:22 PM

Janhvi kapoor Reveals About Mother Sri Devi: बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची लेक म्हणजे जान्हवी कपूर... नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्या आईविषयीच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत...(Actress Janhvi kapoor reveals that her mother sridevi struggled to accept that her daughters were growing up)

ठळक मुद्दे जान्हवी म्हणाली की मी वयात आले तरीही ती मला किंवा माझ्या बहिणीला आम्ही मोठ्या, जाणत्या झालो आहोत असं मानायला तयार नव्हती.

मुलगी जेव्हा १०- १२ वर्षांपेक्षा कमी वयाची असते, तेव्हा सर्वसाधारणपणे बहुतांश घरांमध्ये मुलामुलींमध्ये काहीही फरक केला जात नाही. दोघांनाही एकसमान वागणूक देऊन वाढवले जाते. पण त्यानंतर मात्र मुलींच्या शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होतात आणि मग नकळतच त्यांच्या आईकडून किंवा घरातल्या इतर सदस्यांकडून मुलींची थोडी अधिक काळजी घेतली जाते. प्रत्यक्षात त्या वयात येऊन मासिक पाळी सुरू झालेली नसली तरीही मुलींना थोडं अधिक सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचं मुक्तपणे बागडणं थोडंसं कमी होतं. हे दिवस आणि त्या काळात होणारे शारिरीक बदल मुलींच्या कायम लक्षात राहतात. याच दिवसांच्या आठवणींबाबत जेव्हा अभिनेत्री जान्हवी कपूरला विचारलं गेलं, तेव्हा तिने तिच्या आईविषयीची एक खास आठवण सांगितली. (Actress Janhvi kapoor reveals that her mother sridevi struggled to accept that her daughters were growing up)

 

टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवी कपूरची Hauterrfly यांच्यावतीने नुकतीच एक मुलाखत घेण्यात आली. यावेळी तिला तिने पहिल्यांदा ब्रा कधी घातली किंवा आई- वडील यांच्यापैकी कोणी तिला याविषयी माहिती दिली असा प्रश्न विचारण्यात आला होता.

स्वयंपाकासाठी तुम्ही भेसळीचे मसाले तर वापरत नाही ना? बघा मसाल्यांची शुद्धता कशी ओळखायची

ते सांगताना ती म्हणाली की अर्थातच माझ्या आईनेच मला त्याविषयी माहिती दिली. पण माझ्या बाबतीत ते खूप सहजासहजी झालं नाही. कारण माझ्या आईला सारखं असंच वाटत होतं की मी अजूनही लहानच आहे. ती आमच्या बाबतीत खूपच हळवी होती. त्यामुळे मी वयात आले तरीही ती मला किंवा माझ्या बहिणीला आम्ही मोठ्या, जाणत्या झालो आहोत असं मानायला तयार नव्हती.

 

तिच्यालेखी आम्ही लहानच होतो. त्यामुळे वयात आल्यावरही मी ब्रा घालावी अशी गरज तिला कधीच वाटली नाही. शेवटी एक दिवस मी स्वत:हूनच तिला सांगितलं की आई आता मला ब्रा घालण्याची खरंच गरज वाटत आहे.

'या' ५ गोष्टींमुळे जपानी लोक उत्साही असतात- झपाट्याने कामं उरकतात! त्यांच्यासारखा फिटनेस हवा तर...

त्यानंतर तिने ती गोष्ट गांभिर्याने घेतली आणि जड मनाने मानलं की आपली मुलगी आता मोठी झाली आहे. लेकीला पाळी सुरू होते, तेव्हा थोड्याफार फरकाने प्रत्येक आईची अवस्था अशीच असते. लेक मोठी हाेते आहे हे तिचं शरीर सांगत असतं, पण आईचं मन ते मानत नसतं. अशावेळी आईला तिच्या हळव्या मनाला आवर घालावीच लागते.   

टॅग्स : आरोग्यमासिक पाळी आणि आरोग्यजान्हवी कपूरश्रीदेवीबोनी कपूर