Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...

मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...

Are Period Panties Actually Safe For Women : Is Period Panties Safe to Use : Does Period Panties Actually Work : पॅड्स, टॅम्पोन, कप्स सोबतच आता मासिक पाळी दरम्यान 'पिरिएड्स पॅंटी' वापरणे कॉमन झाले आहे, पण ते वापरणे चूक की बरोबर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 20:16 IST2025-03-01T19:43:23+5:302025-03-01T20:16:22+5:30

Are Period Panties Actually Safe For Women : Is Period Panties Safe to Use : Does Period Panties Actually Work : पॅड्स, टॅम्पोन, कप्स सोबतच आता मासिक पाळी दरम्यान 'पिरिएड्स पॅंटी' वापरणे कॉमन झाले आहे, पण ते वापरणे चूक की बरोबर?

Are Period Panties Actually Safe For Women Is Period Panties Safe to Use Does Period Panties Actually Work | मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...

मासिक पाळी दरम्यान पिरिएड्स पॅंटी वापरणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात यामागची खरीखुरी कारणं...

दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा महिलांच्या जीवनाचा अविभाज्य भागच आहे. मासिक पाळीच्या त्या ५ दिवसांत महिलांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. पोटदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, हेव्ही पिरीएड्स फ्लो, पॅड लीक होणे, यांसारख्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना स्त्रियांना (Are Period Panties Actually Safe For Women) करावा लागतो. अशा परिस्थितीत, जर पिरीएड्स फ्लो जास्त होत असेल तर काही विशेष गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते(Is Period Panties Safe to Use).

पूर्वीच्या काळात मुली मासिक पाळीच्या वेळी कापड वापरत असत. पण यामुळे महिलांना अनेक आजार होऊ लागले, त्यानंतर सॅनिटरी पॅड येऊ लागले. आता सॅनिटरी पॅड्स व्यतिरिक्त, महिला टॅम्पन्स आणि मासिक पाळीचे कप देखील वापरतात. त्याचवेळी, आजकाल पीरियड पँटीजचा ट्रेंडही खूप दिसून येत आहे. मासिक पाळीच्या पॅन्टी गळतीपासून सुरक्षित असतात आणि त्या घातल्यानंतर पॅड वापरण्याची गरज नसते. याचा वापर केल्याने पॅड वारंवार बदलण्याची गरज देखील असते. पण या मासिक पाळीच्या पँटी (Does Period Panties Actually Work) खरोखर सुरक्षित आहेत का? त्यांचा वापर केल्याने संसर्ग होण्याचा धोका आहे का? याबद्दल अधिक माहितीसाठी, गुरुग्राम येथील सी के बिर्ला हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. आस्था दयाल याबद्दल अधिक माहिती देत आहेत. 

१. मासिक पाळीच्या वेळी पीरियड पँटीजचा वापरणे खरोखर सुरक्षित आहे का? 

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या वेळी पॅन्टी वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे. हे फक्त मासिक पाळी दरम्यान घालण्यासाठी डिझाइन केलेले आहे. पीरियड पॅन्टी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरियलमुळे ते गळतीपासून सुरक्षित आणि घालण्यास आरामदायी असतात. या पॅन्टीज ओलावा शोषून घेणाऱ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या असतात, ज्यामुळे त्या गळतीपासून सुरक्षित असतात. हे त्वचेला आरामदायी ठेवण्यास आणि स्वच्छता राखण्यास देखील मदत करतात.

जेमतेम १० वर्षाच्या मुलीला मासिक पाळी येते? मासिक पाळी लवकर येण्याची ६ कारणं...

२. पीरियड पँटीजचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाच... 

१. आरामदायी पँटी निवडा :- पीरियड पॅन्टी खरेदी करताना, फॅब्रिककडे नक्कीच लक्ष द्या. नेहमी आरामदायी आणि आपली त्वचा श्वास घेऊ शकेल अशाच कपड्यांपासून तयार झालेल्या पँटीची निवड करा. कारण जर तुम्ही चुकीच्या कापडापासून बनवलेल्या पॅन्टीज निवडल्या तर त्यामुळे पुरळ आणि जळजळ देखील होऊ शकते.

२. स्वच्छता राखा :- जर तुम्ही त्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली तरच मासिक पाळीच्या पँटी तुमच्यासाठी सुरक्षित आहेत. वापरल्यानंतर, ते पूर्णपणे स्वच्छ आणि वाळवा. कारण स्वच्छता राखल्याने बॅक्टेरियाची वाढ आणि संसर्ग होण्याचा धोका देखील कमी होतो.

सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

३. ब्लडफ्लोनुसार पँटीची निवड करा :- जर एखाद्याची त्वचा संवेदनशील असेल किंवा त्याला सहजपणे यूटीआय होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पीरियड पॅन्टी वापरावी. याव्यतिरिक्त, ज्या महिलांना जास्त रक्तस्त्राव होतो.त्यांना मासिक पाळीच्या पॅन्टीजची समस्या देखील येऊ शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पॅन्टी निवडावी.

४. वेळेवर बदला :- दर ६ ते ८ तासांनी मासिक पाळीच्या पँटी बदला आणि त्या पूर्णपणे स्वच्छ करा. कारण जर तुम्ही ते जास्त वेळ घातले तर तुम्हाला संसर्गाचा धोका असू शकतो. काही महिला मासिक पाळीच्या पॅन्टीसोबत इतर गोष्टी देखील वापरतात. पण याचा पिरेड्स फ्लोवर देखील परिणाम होऊ शकतो. म्हणून मासिक पाळीच्या वेळी पँटीसोबत इतर कोणत्याही वस्तूंचा वापर करु नये. 

कोणतेही मासिक पाळीच्या स्वच्छतेचे उत्पादन वापरण्यापूर्वी, उत्पादनाची गुणवत्ता नक्कीच पहा. कारण काळजी न घेता कोणतेही उत्पादन वापरल्याने संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो.

Web Title: Are Period Panties Actually Safe For Women Is Period Panties Safe to Use Does Period Panties Actually Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.