Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

avoid these mistakes for a healthy period cycle in pcos : To maintain a healthy period cycle with PCOS, you can avoid these mistakes : जीवनशैलीतील काही बदलांमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2024 02:04 PM2024-10-13T14:04:04+5:302024-10-13T14:22:01+5:30

avoid these mistakes for a healthy period cycle in pcos : To maintain a healthy period cycle with PCOS, you can avoid these mistakes : जीवनशैलीतील काही बदलांमुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही

avoid these mistakes for a healthy period cycle in pcos To maintain a healthy period cycle with PCOS, you can avoid these mistakes | मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

मासिक पाळी वेळेवर यावी म्हणून ५ चुका तुम्हीही करता? पीसीओएस असेल तर 'या' चुका वेळीच टाळा...

मासिक पाळी ही एक सामान्य गोष्ट आहे. दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीत गर्भाशयाच्या आतील रक्त आणि ऊती योनीमार्गे बाहेर टाकले जातात. हे सहसा महिन्यातून एकदा होते. साधारणपणे  २८ ते ३० दिवसांत मासिक पाळी येते. पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया असून ती वेळच्या वेळी येणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगले असते. पण या चक्रात काही अडथळा निर्माण झाला असेल तर मासिक पाळी पुढे-मागे होण्याची शक्यता असते. २ ते ४ दिवस पाळी पुढे-मागे झाली तर ठिक आहे, पण २ ते ३ महिने मासिक पाळी न येणे यांसारख्या समस्येला अनेकजणींना सामोरे जावे लागते. PCOS असणा-या बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी असंतुलनाची समस्या असते. या समस्येत कधी तारखेच्या अनेक दिवस आधी तर कधी तारखेनंतर मासिक पाळी येते. याशिवाय पिरिएड क्रॅम्प्स आणि पिरिएड फ्लोमध्येही फरक दिसून येतो. मासिक पाळी असंतुलनाची अनेक कारण असू शकतात. आपण आपल्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये अनेक लहान मोठ्या चुका करतो, आणि हेच आपल्या पिरिएड सायकल असंतुलनाचे मुख्य कारण आहे(avoid these mistakes for a healthy period cycle in pcos).

PCOS असेल तर दर महिन्याला येणाऱ्या पिरिएडसच्या बाबतीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पिरिएडसच्या बाबतीत दर महिन्याला येणाऱ्या या समस्यांना तोंड देताना नकोसे वाटते. पिरिएडस दरम्यान येणारे असे अनेक प्रोम्ब्लेम्स योग्य आहार आणि अचूक लाईफस्टाईलच्या मदतीने कायमचे दूर करता येऊ शकतात. हार्मोन कोच पूर्णिमा पेरी यांनी PCOS बद्दल अधिक माहिती देणारा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमधील नेमक्या कोणत्या चुकांमुळे मासिक पाळीचे चक्र अनियमित होते, याबद्दल अधिक माहिती दिली आहे. या चुका कोणत्या आहेत आणि त्या सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे ते पाहूयात(To maintain a healthy period cycle with PCOS, you can avoid these mistakes).

या चुकांमुळे मासिक पाळीचे चक्र अनियमित होते....  

चूक १ :- चुकीचे किंवा चुकीच्या पद्धतीने डाएट करणे. 

पीसीओएसमुळे अनेक महिलांचे वजन नैसर्गिकरीत्या वाढते. यासाठी काहीजणी आपले वाढते वजन पाहून ते कमी करण्यासाठी चुकीचे किंवा चुकीच्या पद्धतीने डाएट करतात. डाएट करताना अनेकजणी आपल्या आहारातील अनेक पदार्थ खाणेच टाळतात. परंतु यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, त्यामुळे मासिक पाळी देखील अनियमित पद्धतीने येते. त्यामुळे PCOS  असणाऱ्यांनी आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांची विशेष काळजी घ्यावी. 

मासिक पाळीत डाग पडण्याची भीती, पॅड लिक होते? ५ सोपे उपाय, बिंधास्त व्हा...

चूक २ :- दररोज एक्सरसाइज न करणे.        

PCOS मध्ये, आपल्या शरीरातील इंसुलिन सेन्सेटीव्हिटी आणि ईस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स कायम असंतुलित असतात. या दोन्ही हार्मोन्सचा योग्य तो समतोल  राखण्यासाठी दररोज एक्सरसाइज करणे आवश्यक असते. जर तुम्ही दररोज किमान नॉर्मल वॉक जरी करत असाल तर त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होईल पायात पेटके येण्याचे प्रमाण कमी होतील आणि मासिक पाळी देखील संतुलित होण्यास मदत होईल. 

चूक ३ :- पुरेशा प्रमाणात झोप न घेणे. 

पीसीओएस ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे, म्हणून यात आपल्या शरीरातील हार्मोन्सकडे लक्ष देणे गरजेचे असते. जर तुम्हाला दररोज पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे पीरियड्स सायकलचे असंतुलन देखील होऊ शकते. त्यामुळे नियमित ८ ते ९ तासांची झोप घ्या.

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी...

चूक ४ :- अतिप्रमाणात कॅफिन घेणे. 

PCOS मुळे येणारा थकवा आणि आळस कमी करण्यासाठी काहीजणी सतत  चहा, कॉफी पिणे पसंत करतात. पण जर तुम्हाला जास्त चहा-कॉफी पिण्याची सवय असेल तर त्याचा तुमच्या पीरियड सायकलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात कॅफिन घेतल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते ज्यामुळे मासिक पाळी असंतुलन होऊ शकते.

चूक ५ :- स्ट्रेस मॅनेजमेंट न करणे.    

स्ट्रेस हे हार्मोनल असंतुलनाचे सर्वात मोठे कारण असू शकते. यामुळे पीरियड्सही नियमित येत नाहीत, जर तुम्हाला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीचा स्ट्रेस घेण्याची सवय असेल तर त्यामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोन्सची पातळी वाढू शकते, आणि यामुळे मासिक पाळीत असंतुलन होऊ शकते. 

या चुकांमुळे, तुमची मासिक पाळी PCOS आणि PCOD मध्ये असंतुलित होऊ शकते. पण जर तुम्ही आपल्या लाईफस्टाईलमधील या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची मासिक पाळी कोणत्याही समस्यांशिवाय नियमित होऊ शकते.

Web Title: avoid these mistakes for a healthy period cycle in pcos To maintain a healthy period cycle with PCOS, you can avoid these mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.