Join us   

पाळीत पोट दुखतं-क्रॅम्स येतात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते ५ आसनं, त्रास कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2024 7:06 PM

5 Best Yoga Poses To Soothe Your Period Cramps : Celeb Yoga Instructor Anshuka Parwani Tells You The 5 Best Yoga Poses For Menstrual Cramps : 5 Yoga Poses For Your Period to Help Relieve Cramps : मासिक पाळीत पोटदुखी थांबण्यासाठी गोळ्या न घेता करा ५ सोपी आसनं, पोटदुखी - क्रॅम्सपासून मिळेल आराम...

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. दर महिन्यात चार ते पाच दिवस मासिक पाळीचा रक्तस्त्राव होतो. बहुतेक महिलांसाठी हा काळ खूपच त्रासदायक असतो. काहीजणींना या मासिक पाळीचा खूप त्रास होतो तर काहींना अजिबात वेदना होत नाहीत. काही महिलांना पोटात दुखणे, क्रॅम्प्स, मूड स्विंग आणि ब्लोटिंग अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण ही एक नैसर्गिक आणि गरजेची प्रक्रिया असून दर महिन्याला वेळेवर मासिक पाळी येणं ही एक चांगली गोष्ट मानली जाते(5 Best Yoga Poses To Soothe Your Period Cramps).

परंतु मासिक पाळीदरम्यान पोटात दुखून येणारे क्रॅम्प्स यामुळे जीव नकोसा होतो. अशावेळी काही स्त्रिया पोटात दुखणे किंवा येणारे क्रॅम्प्स थांबवण्यासाठी काही गोळ्या घेतात. या गोळ्या खाणे शरीरासाठी हानीकारक ठरु शकते. म्हणूनच मासिक पाळीच्या दरम्यान पोटात दुखणे किंवा क्रॅम्प्स येणे यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही सोपे योगा प्रकार करु शकतो. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Yoga Instructor Anshuka Parwani) फिटनेस आणि हेल्थ चांगली ठेवण्यासाठी नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून उपयोगी टिप्स (5 Yoga Poses For Your Period to Help Relieve Cramps) शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मासिक पाळी दरम्यान पोटात दुखून क्रॅम्प्स आल्यास कोणत्या प्रकारची योगासन करावीत याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. ही सहजसोपी योगासन करून आपण मासिक पाळीदरम्यान होणारा पोटदुखीचा त्रास थांबवू शकतो(Celeb Yoga Instructor Anshuka Parwani Tells You The 5 Best Yoga Poses For Menstrual Cramps).

मासिक पाळी दरम्यान पोट दुखत असेल तर कोणती आसनं करावीत ? 

१. बटरफ्लाय पोझ :- दोन्ही पाय समोर ठेवून बसा. पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असे ठेवा. हात गुडघ्यावर ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला. त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चार-पाच वेळा करा. यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा. आता गुडघे वेगानं वर-खाली करत राहा. म्हणजे फुलपाखरांचे पंख जसे वर-खाली होत असतात तसेच. श्वासोच्छ्वासाची गती सामान्य ठेवत आठ ते दहा वेळा ही क्रिया करा.

नाक चोंदले की झोप येत नाही? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते खास उपाय, मिनिटांत नाक मोकळं...

२. वाईड अँगल सीटेड फॉरवर्ड पोझ :- वाईड अँगल सीटेड फॉरवर्ड पोझ करण्यासाठी दोन्ही पाय लांब करून बसावे. बसताना आपले दोन्ही पाय लांब केल्यावर पायांचा काटकोन होईल अशा स्थितीत बसावे. त्यानंतर कमरेतून हलकेच थोडे पुढे झुकून हाताचे तळवे जमिनीला टेकवून स्पर्श करावा. अशा स्थितीत १ ते ३ मिनिटे तसेच राहावे आणि त्यानंतर पुन्हा आहे त्याच स्थितीत यावे. अशी क्रिया चार ते पाच वेळा पुन्हा करावी. 

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

३. डिप इंडियन स्कॉट पोझ :- सर्वातआधी योगा मॅटवर सरळ उभे राहा. पाय सरळ ठेवत पोट आतमध्ये घ्या. खांदे ताणून घ्या आणि दीर्घ श्वास घ्या. हात जोडून नमस्कार करा. श्वास सोडत गुडघे दुमडून खाली बसा. पायांच्या जांघेमध्ये ताण येईल अशा पद्धतीने दोन्ही पाय बाहेरच्या दिशेने ताणून घ्यावेत. अशा स्थितीत १ ते ३ मिनिटे तसेच राहावे आणि त्यानंतर पुन्हा आहे त्याच स्थितीत यावे. अशी क्रिया चार ते पाच वेळा पुन्हा करावी.  

४. लेग अप ऑन वॉल :- लेग अप ऑन वॉल करण्यासाठी भिंतीच्या जवळ बसावे. सर्वात आधी जमिनीला पाठ टेकवून झोपावे. त्यांनतर आपले दोन्ही पाय सरळ  रेषेत वर करून भिंतीला चिकटवून घ्यावेत. दोन्ही हात दोन्ही बाजूला जमिनीवर टेकवून रिलॅक्स ठेवावेत. भिंतीला आपले शरीर टेकवून काटकोन तयार होईल अशा पोझमध्ये राहावे. अशा स्थितीत १ ते ३ मिनिटे तसेच राहावे आणि त्यानंतर पुन्हा आहे त्याच स्थितीत यावे. अशी क्रिया चार ते पाच वेळा पुन्हा करावी.   

५. रिक्लाईंड बटरफ्लाय पोझ :- तुमचे पाय तुमच्या समोर पसरवून जमिनीवर बसून या आसनाला सुरुवात करावी. आता तुमच्या पायाचे तळवे आपल्या ,मांड्यांच्या बाजूला आता एकत्र आणा आणि तुमचे गुडघे बाहेरच्या बाजूला खाली येऊ द्या. तुमचे तळवे एकमेकांना चिकटवून आणि गुडघे खाली जमिनीला चिकटवून ठेवून तुमचे शरीर हळूहळू तुमच्या पाठीवर मागे नेऊन खाली झोपा. आपले हात आपल्या बाजूला बाहेरच्या दिशेने पसरवून ठेवा आणि हातांचे तळवे वरच्या बाजूला तोंड करुन ठेवा. आता आपले संपूर्ण शरीर आरामाच्या अवस्थेत असताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. अशा स्थितीत १ ते ३ मिनिटे तसेच राहावे आणि त्यानंतर पुन्हा आहे त्याच स्थितीत यावे. अशी क्रिया चार ते पाच वेळा पुन्हा करावी.

तासंतास उभं राहून घरातील काम करताय? करा २ सोपे एक्सरसाइज, पाय-टाचा दुखणार नाही, मिळेल आराम...

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स