Join us   

PCOD असल्याने वजन सतत वाढतेय? २ पदार्थ बंद करा, वजन लवकर कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 6:42 PM

Weight Loss And Diet Tips: PCOD किंवा PCOS चा त्रास असेल तर वजन वाढीची समस्या खूप जास्त जाणवते. म्हणूनच आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे उपाय करून पाहा...(How to reduce weight?)

ठळक मुद्दे तुम्हीही वजन वाढीच्या समस्येने हैराण असाल तर त्यासाठी आहारात नेमके कोणते बदल केले पाहिजेत, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही खास माहिती एकदा वाचायलाच पाहिजे.

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे हल्ली बऱ्याच जणींमध्ये PCOD किंवा PCOS चा त्रास दिसून येतो. पीसीओडीचा त्रास असेल तर इतरही अनेक त्रास होतात, शरीरात अनेक बदल दिसून येतात. पण सगळ्यात प्रामुख्याने जाणवणारी एक गोष्ट म्हणजे वजन खूप लवकर वाढतं. त्यामुळे PCOD किंवा PCOS चा त्रास असणाऱ्या अनेक मैत्रिणी वजन कमी करण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असतात. तुम्हीही वजन वाढीच्या समस्येने हैराण असाल तर त्यासाठी आहारात नेमके कोणते बदल केले पाहिजेत, याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही खास माहिती एकदा वाचायलाच पाहिजे. (Weight Loss And Diet tips for women suffering from PCOS and PCOD)

 

PCOD किंवा PCOS चा त्रास असेल तर आहार कसा असावा?

याविषयी मंजिरी कुलकर्णी सांगतात की हा त्रास प्रामुख्याने शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स क्षमतेशी निगडित असतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी आहार घेताना तो खूपच काळजीपुर्वक घ्यायला हवा. 

तुम्ही खाता ते तूप शुद्ध आहे की भेसळ? कसं ओळखायचं? ४ टिप्स- घरीच करा तुपाची चाचणी

PCOD किंवा PCOS चा त्रास असणाऱ्या मैत्रिणींनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच साखर आणि साखर घालून तयार केलेले गोड पदार्थ खाणं पुर्णपणे बंद करावं. त्यामुळे शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी संतुलित राखण्यास मदत होईल, ज्यामुळे वजन नियंत्रित राहणे शक्य होईल.

 

तसेच PCOD किंवा PCOS चा त्रास असल्यास फ्रुक्टोज जास्त असणारी फळं खाणंही बंद करावं. आंबा, चिकू, केळी या फळांमध्ये फ्रुक्टोज भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अशी फळं खाणं टाळावं.

डोळ्यांभोवती बारीकशा सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स? २ मिनिटांचा सोपा उपाय, काळी वर्तुळं- सुरकुत्या होतील कमी

वरील दोन पदार्थ तर आहारातून वर्ज्य करावेच, पण त्याशिवाय जंकफूड खाण्याचं प्रमाणही अत्यल्प असावं. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवावं. शिवाय भरपूर शारिरीक हालचाल होईल असे रनिंग, सायकलिंग, जाॅगिंग असे व्यायाम रोज करायला हवेत. असे सगळे प्रयत्न एकत्रितपणे केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनावेट लॉस टिप्समासिक पाळी आणि आरोग्यपीसीओडीपीसीओएस