मासिक पाळीदरम्यान होणारी चिडचिड, पोटदुखी, क्रेव्हिंग, हा त्रास चार दिवस अनेकींना होतो. या सगळ्या गोष्टी सांभाळत महिला आपल्या दैनंदिन दिनक्रम पूर्ण करतात. दरम्यान, या दिवसात महिलांना जास्त भीती असते डागाची. मासिक पाळीच्या वेळी, काही मुली कापड तर काही पॅडचा वापर करतात. मात्र, यासह मासिक पाळीतील रक्ताला येणाऱ्या दुर्गंधीमुळे देखील त्रस्त असतात. त्या रक्तस्त्रावाला विशिष्ट गंध येतो. या दुर्गंधीमुळे अनेक महिलांना व्हजायनल इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. ही दुर्गंधी कशाने येते? त्यावर उपाय काय?
मदरहूड हॉस्पिटल, खारघर येथील प्रसूती आणि स्त्रीरोग सल्लागार डॉ. प्रतिमा ठमके यांनी हेल्थ शॉट्स या वेब साईटला यासंदर्भात माहिती दिली आहे. "मासिक पाळीच्या दरम्यान, अनफर्टिलाइज्ड अंडे, रक्त, गादी हे सारं बाहेर पडतं. त्याला विशिष्ट गंध येणं साहजिकच आहे. यामध्ये बॅक्टेरियांचा देखील समावेश असतो. मासिक पाळीच्या दरम्यान हा जंतूसंसर्ग वाढला तर मात्र जास्त दुर्गंधी येऊ शकते.
दुर्गंध का येते?
कुजलेला वास
मासिक पाळीच्या प्रवाहासोबत बॅक्टेरिया देखील बाहेर पडते. त्यामुळे काही स्त्रियांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. हा दुर्गंध असे सूचित करते की, आता पॅड किंवा टॅम्पॉन बदलण्याची वेळ झाली आहे. कधी कधी तीव्र प्रवाहामुळे वास येतो. त्यामुळे वेळेवर पॅड बदलणे खूप महत्त्वाचे आहे.
फिशी स्मेल
मासिक पाळी दरम्यान, किंवा त्याच्या आधी योनीमधून दुर्गंधी येते. बॅक्टेरियांचे अधिक प्रभाव असला तर लघवी करताना जळजळ, खाज सुटणे असे प्रकार घडतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आणि आपली योनी नेहमी स्वच्छ करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
धातूचा वास
जेव्हा मासिक पाळी दरम्यान, तांब्याच्या धातुसारखे गंध येत असेल. तर समजून जा की, रक्तात आयरनचे प्रमाण अधिक आहे. आणि ही आपल्या शरीरासाठी चांगली बाब आहे.
आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी
अस्वच्छता
मासिक पाळीतील रक्तस्त्रावात कांदा किंवा मीठाचा गंध येतो. हा गंध अस्वच्छतेमुळे येतो. त्यामुळे योनीचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. टॅम्पॉन आणि सॅनिटरी पॅड वेळोवेळी बदलावे. तसेच, दुर्गंधी टाळण्यासाठी मासिक पाळी दरम्यान दररोज आंघोळ करणे महत्वाचे आहे.
योनीच्या पीएचमध्ये असंतुलन
जर तुमच्या मासिक पाळीच्या रक्ताला गोड वास येत असेल, तर काळजी करू नका. कारण ही बाब पूर्णपणे सामान्य आहे. जेव्हा तुमच्या योनीची pH पातळी अम्लीय बाजूकडे अधिक वळते तेव्हा असे होते.
ॲलर्जी आणि संक्रमण
संसर्ग आणि ॲलर्जीमुळे योनीमार्गातून दुर्गंधी येते. त्यामुळे योनीतून येणाऱ्या दुर्गंधीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. दुर्गंधी, योनीतून स्त्राव किंवा मासिक पाळीच्या दरम्यान स्पॉटिंग यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांनी सांगितलेले औषध आणि सल्ला घेणे आवश्यक.