महिन्यातील ते ४ दिवस महिलांसाठी अत्यंत महत्वाचे असतात. मासिक पाळी हा महिलांच्या शरीरातील अविभाज्य भाग आहे. या दरम्यान, महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. कधी स्तनात वेदना होतात, तर कधी त्वचेवर फरक दिसून येतो. याशिवाय पोटदुखी, पाठदुखी या समस्या तर आहेच. दरम्यान, मासिक पाळीच्या वेळी, आपण पाहिलं असेल चेहऱ्यावर ग्लो येतो.
पीरियड्समध्ये चेहऱ्याच्या संबंधित समस्या काही प्रमाणात कमी होते. काहींची त्वचा चमकू लागते. तर, काहींच्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढू लागतात. दरम्यान, असे का घडते? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पीरियड सायकलमध्ये त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. खरंतर मासिक पाळीतील हार्मोन्स त्वचेवर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये परिणाम करतात. यामुळेच कधी त्वचेवर पुरळ उठू लागते तर कधी त्वचेचा ग्लो वाढतो.
यासंदर्भात डॉक्टर दिव्या शर्मा सांगतात, ''पीरियड सायकलचा पहिला टप्पा म्हणजे फॉलिक्युलर फेज जो सुमारे 7 ते 10 दिवस चालतो. या टप्प्यामध्ये, शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढते ज्यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढू लागते. या टप्प्यावर त्वचा सर्वोत्तम स्थितीत असते, त्वचेच्या छिद्रांचा आकार आकसत असताना तुमचा चेहरा चमकू लागतो. ब्राइटनिंग मास्क वापरून अथवा त्वचा एक्सफोलिएट करून तुम्ही ही चमक वाढवू शकता.''
पिरियड्स दरम्यान का चमकते त्वचा?
आपल्या त्वचेतील बदल हार्मोन्सच्या बदलांमुळे होतो. गरोदरपणात महिलांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो, त्यामुळे महिलांचा चेहरा लगेच बदलू लागतो.
आपली त्वचा तेलकट बनवण्यात काही हार्मोन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हार्मोन्स प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा हे हार्मोन्स मासिक पाळी दरम्यान वाढू लागतात, तेव्हा त्वचा तेलकट दिसते आणि कमी कोरडी होते.
पीरियड्समध्ये इस्ट्रोजेनसोबत टेस्टोस्टेरॉनचे प्रमाणही वाढू लागते, ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र लहान दिसू लागतात.
जेव्हा शरीरात इस्ट्रोजेनची पातळी वाढू लागते, तेव्हा महिलांना मुरुमांच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासोबतच त्याचा त्वचेच्या टोनवरही परिणाम होतो. मासिक पाळी येणार असते तेव्हा इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे फ्रिकल्स, मुरुम इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा शरीरात पुन्हा एस्ट्रोजन वाढू लागते आणि चेहऱ्यावरील समस्या दूर होतात.