Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात..

दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात..

Endometriosis Types, Symptoms, Causes, Treatments : एण्डोमेट्रिऑसिस: हा आजार नक्की काय आहे? कशाने होतो आणि कायमचा बरा होऊ शकतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 03:58 PM2023-11-03T15:58:00+5:302023-11-03T16:40:09+5:30

Endometriosis Types, Symptoms, Causes, Treatments : एण्डोमेट्रिऑसिस: हा आजार नक्की काय आहे? कशाने होतो आणि कायमचा बरा होऊ शकतो का?

Endometriosis Causes : Endometriosis Types Symptoms, Causes Treatments by experts | दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात..

दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात..

- डॉ. आशीष गावडे

‘मासिक पाळी’बद्दल मित्रमंडळी किंवा कुटुंबियांशी मासिक पाळीबद्दल बोलण्यास आता स्त्रियांना अवघडल्यासारखे वाटत नाही. तरीही मासिक पाळीच्या काळातील तीव्र वेदनेकडे त्या फारशा गांभीर्याने बघत नाहीत. यामागे काही खरोखर गंभीर कारण असू शकेल आणि यावर उपाय करण्याची गरज आहे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. शांतपणे सहन करत राहण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात आढळते.

मासिक पाळीच्या काळात तीव्र वेदना होणे किंवा सहसा होत नाही एवढा जास्त रक्तस्राव होणे हे सामान्य आहे असे सर्वच ठिकाणच्या स्त्रियांना वाटत असल्याचे जगभरातील अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. मात्र, हे अनेकदा सामान्य नसू शकते आणि एण्डोमेट्रिऑसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंभीर अवस्थेची ही लक्षणे असू शकतात. पौगंडावस्थेतील मुलींना व त्यांच्या मातांना, एण्डोमेट्रिऑसिस आणि त्याच्या लक्षणांबाबत सखोल समज असणे, ही अवस्था ओळखून उपचार करणे गरजेचे आहे.

सुरुवातीपासून व सातत्यपूर्ण शिक्षण

मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे शिक्षण प्रत्येक मुलीला दिले पाहिजे. विशेषत: वेदनांची तीव्रता व रक्तस्रावाचे प्रमाण ह्याबद्दल सांगितलेच पाहिजे. मुलीने तीव्र वेदना होत असल्याची तक्रार प्रथम केल्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवले पाहिजे हे पालकांना समजले पाहिजे, कारण, ही एण्डोमेट्रिऑसिसची सुरुवात असू शकते. या अवस्थेला पहिल्या मासिक पाळीपासून सुरुवात होऊ शकते किंवा मासिक पाळी सुरू झाल्यापासून अनेक वर्षांनंतरही सुरुवात होऊ शकते. ही अवस्था रजोनिवृत्तीपर्यंत आणि क्वचित त्यानंतरही कायम राहू शकते.

हात-पाय सुकडे फक्त पोटच सुटलंय? जमिनीवर बसल्या बसल्या ५ व्यायाम करा, सपाट होईल पोट

म्हणूनच प्रौढ स्त्रियांनाही ह्याबद्दल शिक्षण देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांच्या तीव्रतेत अचानक वाढ होणे किंवा रक्तस्रावाच्या प्रमाणात बदल होणे ह्या बाबींची तपासणी झाली पाहिजे आणि प्रौढ स्त्रियांमध्येही ह्याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. ओटीपोटात सतत दुखत राहणे, मासिक पाळीच्या काळात तीव्र वेदना होणे, लैंगिक समागमादरम्यान वेदना होणे आणि वंध्यत्व ह्या एण्डोमेट्रिऑसिसच्या अन् लक्षणांबाबतही स्त्रियांनी जागरूक राहिले पाहिजे.

वेळेत व अचूक निदान

एण्डोमेट्रिऑसिस आता ‘मिस्ड डिसीज (लक्षात न येणारा आजार)’ म्हणून ओळखला जातो. कारण, स्त्रिया मोठ्या प्रमाणात ह्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचे निदान होत नाही किंवा ह्या अवस्थेसाठी वैद्यकीय मदत घेतली जात नाही. एण्डोमेट्रिऑसिसचे निदान होण्यास सरासरी ८-१२ वर्षांचा कालावधी लागतो. भारतात अंदाजे ४ कोटी २० लाख स्त्रिया ह्या अवस्थेने ग्रस्त आहेत. भारतातील मधुमेहाने ग्रासलेल्या स्त्रियांच्या संख्येच्या जवळ जाणारी ही संख्या आहे आणि तरीही एण्डोमेट्रिऑसिसवर उपचार करण्यावर खूपच कमी लक्ष दिले जात आहे. ह्या अवस्थेमुळे शरीरशास्त्रात गुंतागुंती निर्माण होतातच पण ह्यामुळे मानसिक व मानसशास्त्रीय आघातही होऊ शकतो.

कोणत्या वेळेत सुर्य प्रकाशात गेल्यानं जास्तीत जास्त व्हिटामीन-D मिळते? आजार टाळायचेत तर....

एण्डोमेट्रिऑसिसमुळे व्यक्तींमधील संबंधांवर परिणाम होतो तसेच स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. एण्डोमेट्रिऑसिसमुळे हृदयविकार व पक्षाघाताचा धोकाही वाढत असल्याचे अलीकडेच झालेल्या अभ्यासादरम्यान आढळले आहे. एण्डोमेट्रिऑसिसचे वेळेत व्यवस्थापन झाले, तर हे धोकेही टाळता येतील. ह्यामध्ये यश मिळवण्यासाठी लहान मुली, माता, शिक्षक आणि डॉक्टर्स ह्या सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

सुरुवातीलाच तज्ज्ञांचा हस्तक्षेप

अनेकदा स्वत:ची किंवा मुलींची मासिक पाळी अनियमित झाल्यास स्त्रिया किंवा माता जनरल प्रॅक्टिशनर्सना किंवा कुटुंबाच्या फिजिशिअन्सना दाखवतात. एण्डोमेट्रिऑसिसच्या निदानामध्ये हे प्राथमिक स्तरावरील फिजिशिअन्स महत्त्वाची भूमिका बजावत असले, तरी योग्य उपचार वेळेत सुरू होण्यासाठी, संबंधित स्त्री किंवा मुलीला वेळीच स्त्रीरोगतज्ज्ञांकडे पाठवणे आवश्यक आहे. फेडरेशन ऑफ ओब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजकल सोसायटीज ऑफ इंडियासारख्या (एफओजीएसआय) संस्थांनी जनरल फिजिशिअन्स आणि स्त्रीरोगतज्ज्ञ ह्यांच्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम, एण्डोमेट्रिऑसिससारखे आजार अधिक चांगले समजून घेण्यात व रुग्णांना व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात, उपयुक्त ठरतात.

ह्यावर प्रभावी उपचारांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही अवस्था कायमस्वरूपी बरी होत नसली तरी एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे व त्यामुळे होणाऱ्या गुंतागुंती ह्यांचे व्यवस्थापन उपचारांद्वारे केले जाऊ शकते. त्यामुळे दर महिन्याला होणारा त्रास बंद होऊ शकतो. मात्र, उपचार प्रभावी ठरण्यासाठी ते वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. तएण्डोमेट्रिऑसिसवरील उपचारांमधील प्रगतीबाबतही स्त्रीरोगतज्ज्ञांनी अद्ययावत राहण्याची आवश्यकता आहे.

एण्डोमेट्रिऑसिसवर उपचार करण्यासाठी हिस्टरेक्टॉमी (गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) हा अगदी अखेरचा पर्याय असला पाहिजे हे माहीत करून घेणे महत्त्वाचे आहे. फार थोड्या स्त्रियांमध्ये या अवस्थेवर उपचार करण्यासाठी हिस्टरेक्टॉमी हा एकमेव पर्याय असतो. मात्र, लक्षावधी स्त्रियांमधील एण्डोमेट्रिऑसिस कमी करण्यासाठी योग्य वेळेत निदान व उपचार पुरेसे ठरतात.

(लेखक बायर फार्मामध्ये कंट्री मेडिकल डायरेक्टर आहेत.)

Web Title: Endometriosis Causes : Endometriosis Types Symptoms, Causes Treatments by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.