वयाच्या १४- १५ वर्षांपासून मासिक पाळी जी मागे लागते ती अगदी चाळीशीनंतरही साथ देते. पाळीच्या प्रत्येक टप्प्यातले प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात. सुरुवातीला पाळी सुरू होते तेव्हा मुलींना खूप जास्त पोट दुखणे, पाय, पाठ, कंबर दुखणे असे त्रास होतो. मेनोपाॅजचा त्रास तर वेगळाच असतो. आणि साधारण तिशी- पस्तीशीच्या महिलांना होणारा पाळीचा त्रासही वेगळाच असतो. तिशी- पस्तिशीच्या आतबाहेर वय असणाऱ्या बऱ्याच महिलांना पाळीमध्ये खूपच कमी रक्तस्त्राव होतो (experts suggestion for the regular periods). ज्याप्रमाणे खूप जास्त ब्लिडींग होणं आरोग्यासाठी चांगलं नाही, त्याचप्रमाणे खूप कमी ब्लिडींग होणंही चांगलं नाही. म्हणूनच तुम्हालाही पाळीमध्ये खूपच कमी म्हणजेच अगदी १- २ दिवसच ब्लिडींग होत असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला हा उपाय करून पाहा. (what to do if you have just 1 or 2 days bleeding in menstrual period?)
मासिक पाळीमध्ये खूपच कमी रक्तस्त्राव होत असेल तर उपाय
शरीरातील इस्ट्रोजीन, प्रोजेस्टरॉन या हार्मोन्सचे प्रमाण जेव्हा कमी- जास्त होते किंवा त्यांचे संतुलन बिघडते तेव्हा मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होणे, मेनोपॉजचा त्रास वाढणे, पाळी अनियमित होणे असे त्रास जाणवतात.
श्रीदेवीची खास आठवण सांगताना जान्हवी कपूर म्हणाली- मी वयात आले होते, तरीही आई मला......
हे सगळे त्रास कमी करून पाळी नियमित होण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.sugandha07 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पाळीतील रक्तस्त्राव सुरळीत होण्यासाठी आणि त्याचबरोबर पाळी नियमित येण्यासाठी सीड्स थेरपी हा एक सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ४ प्रकारच्या बियांचे एका विशिष्ट पद्धतीने सेवन करायचे आहे.
पाळी नियमित होण्यासाठी उपाय
सीड्स थेरपी अंतर्गत ४ प्रकारच्या बिया नेमक्या कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने खाव्या, याविषयी माहिती देताना डॉक्टर सांगतात की तुमची मासिक पाळीची सायकल जेवढ्या दिवसांची असेल त्याचे दोन टप्पे करा. उदाहरणार्थ पाळी दर २८ दिवसांनी येत असेल तर १४- १४ दिवसांचे दोन टप्पे करावेत.
मुलांना कमी वयातच चष्मा लागू नये म्हणून ५ पदार्थ खाऊ घाला; नजर कमजोर होणार नाही
यानंतर पहिल्या १४ दिवसांमध्ये दररोज भोपळ्याच्या बिया आणि जवस दिवसातून एकेक चमचा खा. त्यानंतरच्या पुढच्या १४ दिवसांत सुर्यफुलाच्या बिया आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ रोज एकेक चमचा खा. यामुळे पाळीमध्ये चांगला रक्तस्त्राव होईल आणि पाळी नियमित होईल.