आज प्रत्येकाचंच लाईफस्टाईल बदललं आहे आणि त्यातही करिअरचा, शिक्षणाचा, नोकरीचा ताण एवढा वाढला आहे की त्याचा एकत्रित परिणाम होऊन अनेक आजार मागे लागले आहेत. आज पीसीओएसचा (PCOS) त्रास होणाऱ्या तरुणींचं, महिलांचं प्रमाणही खूप वाढलं आहे. याचं कारण म्हणजे शरीरात मोठ्या प्रमाणावर होत असलेलं हार्मोन्सचं असंतुलन ((harmonal imbalance). अमूक एक अन्नपदार्थ खाल्ला की पीसीओएचा त्रास कमी होऊ शकतो, असं नाही. पण काही पदार्थ खाल्ले तर मात्र नक्कीच शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवता येते आणि त्यामुळे पीसीओएसचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो (3 solutions to control the PCOS), असं डॉ. शीतल सचदेव यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं.
पीसीओएसचा त्रास कमी करण्यासाठी १. लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्यामुळे सुकामेवा, बेरी प्रकारात येणारी फळं, स्टार्च जास्त असणाऱ्या भाज्या, कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असणारे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारातला समावेश वाढवावा.
२. Dietary Approaches to Stop Hypertension यालाच हल्ली DASH diet असं म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये पालेभाज्या, फळं, लो फॅट असणारे डेअरी प्रोडक्ट्स यांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील सॅच्युरेटेड फॅट्सची पातळी कमी होण्यास मदत होते.
३. तज्ज्ञांच्या मते हार्मोन्सची पातळी संतुलित राखण्यासाठी आहारात जसा बदल करणं गरजेचं आहे, तसाच बदल तुमच्या जीवनशैलीमध्येही करणं आवश्यक आहे.
मुलं अबोल, बुजरी होत आहेत? पालकांचं काही चुकतं की.. करा ३ गोष्टी, मुलं होतील हसरी!
ज्या महिलांना पीसीओएसचा त्रास आहे, अशा महिलांनी दिवसांतून ३० मिनिटे तरी नियमितपणे व्यायाम किंवा योगा करणं गरजेचं आहे. त्यासोबतच दररोज ठराविक वेळेसाठी प्राणायाम केल्यानेही लाभ होतो. तसेच रात्री किमान ७ ते ८ तासांची झोप तरी झालीच पाहिजे.