Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

Foods That Help Reduce Period Cramps : हा त्रास कमी करण्यासाठी वारंवार पेनकिलर घेणंही चुकीचं आहे. पिरिएड्स पेन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे ते पाहूया. (Foods That Help Reduce Period Cramps)

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 04:49 PM2023-07-28T16:49:16+5:302023-07-28T19:47:04+5:30

Foods That Help Reduce Period Cramps : हा त्रास कमी करण्यासाठी वारंवार पेनकिलर घेणंही चुकीचं आहे. पिरिएड्स पेन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे ते पाहूया. (Foods That Help Reduce Period Cramps)

Foods That Help Reduce Period Cramps : Menstrual Cramp Home Remedies to Manage Pain | मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी ५ पदार्थ खा; कंबरदुखी-पोटदुखीचा त्रास कमी

दर महिन्याला मासिक पाळीच्या ४ ते ५ दिवसात परिएड्सच्या वेदना जाणवतात. त्यामुळे कशातही मन लागत नाही. अशक्तपणा आल्यासारखे जाणवते. (Foods That Help with Cramps) आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर या वेदना टाळता येऊ शकतात. हा त्रास कमी करण्यासाठी वारंवार पेनकिलर घेणंही चुकीचं आहे. पिरिएड्स पेन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खायचे ते पाहूया. (Foods That Help Reduce Period Cramps) 

आराम करा

मासिक पाळीत थकवा येणे सामान्य आहे आणि मासिक पाळीच्या वेदनांमुळे तुम्हाला ते अधिक जाणवू शकते. म्हणूनच शरीर आणि मन दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे. मासिक पाळी दरम्यान रात्री किमान 8 तास झोपण्याचा प्रयत्न करा.

कॅफेन जास्त घेऊ नका

मासिक पाळीत कॅफिनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्याने जळजळ होणे, पोट फुगणे इत्यादी समस्या वाढू शकतात. आपण हर्बल चहा पिऊ शकता.  डार्क चॉकलेट खा यामुळे तुमचा मूडही चांगला राहील

दही-भात

मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी दुपारच्या जेवणासाठी दही भात हा एक चांगला पर्याय आहे. शेंगदाण्यांसह दही भात घरगुती तळलेल्या पापडाबरोबर एकत्र करून एक स्वादिष्ट, चवदार जेवण तयार येते. ज्यामुळे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

भरपूर पाणी प्या

मासिक पाळीच्या दरम्यान पोट फुगल्यामुळे जास्त पाणी पिणं कठीण वाटतं. तरीही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.  काकडी खा यामुळे शरीरात पाण्याची कमतरता  होणार नाही.

नट्स

पिरिएड्सच्या ४ ते ५ दिवसात मूठभर काजू किंव  शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. नाश्ताला केळी किंवा  गुळासह शेंगदाणे खावेत.  गुळात एंटी-इंफ्लामेटरी आणि एंटीस्पास्मोडिक गुण असतात. अशक्तपणा टाळता येतो, मानसिक आरोग्य चांगले राहते, लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे, यामुळे चयापचन सुधारते आणि मज्जासंस्था मजबूत होते.सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्यानेही आराम मिळतो.  नारळपाणी दिवसभरातून २ वेळा प्यावे. 

खिचडी

खिचडी ही पाळीच्या दिवसांसाठी चांगली मानली जाते. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी  तुम्ही डाळ तांदळाची किंवा बाजरीची खिचडी खाऊ शकता. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणासाठी खिचडी हा उत्तम पर्याय आहे. 

Web Title: Foods That Help Reduce Period Cramps : Menstrual Cramp Home Remedies to Manage Pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.