मासिक पाळीच्या दिवसांत पोट दुखीचा त्रास बहुतांश तरुणींना होत असतो. अनेक जणींना तर हा त्रास अजिबात सहन होत नाही. मग बऱ्याचदा शाळा, कॉलेज, ऑफिसला जाणंही काही जणींना शक्य होत नाही. पाेटदुखी कमी करण्यासाठी मग अनेक जणी गोळ्या घेतात, पण वारंवार दर महिन्यातच अशा गोळ्या घेणे नकोसे वाटते. म्हणून पोटदुखी थांबविण्यासाठी आता हा एक आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Home remedies for pains during periods) करून पाहा. पाळी सुरू झाली की हा काढा घ्या. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीही पोट दुखत असेल तर दिवसांतून एकदाच हा काढा घ्यावा. (Special drink or kadha for reducing menstrual pain)
पाळीमधली पोटदुखी कमी करण्यासाठी उपाय
हा काढा कसा तयार करायचा, याविषयीचा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी इन्स्टाग्रामच्या missherbofficial या पेजवर सुचविला आहे. काढा तयार करण्यासाठी आपल्याला एक कप गरम पाणी, १ टीस्पून आल्याचा किस, अर्धा टी स्पून हळद, १ टीस्पून मध, अर्धा टीस्पून लिंबाचा रस एवढं साहित्य लागणार आहे.
ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड
काढा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एक कप पाणी एका पातेल्यात टाकून गॅसवर उकळायला ठेवा..
पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा आणि पाणी एका कपात काढून घ्या. त्यात आल्याचा किस आणि हळद टाका. आता कपावर झाकण ठेवून द्या.
फक्त २ पदार्थ वापरून गणपतीसाठी १० मिनिटांत करा मस्त मोदक, प्रसादाला काय करायचं, टेन्शनच नाही...
८ ते १० मिनिटांनी ते पाणी गाळून घ्या. त्यात मध आणि लिंबाचा रस टाकून व्यवस्थित हलवून घ्या. झाला काढा तयार.
हा काढा पाळी सुरू झाल्यावर आणि त्यापुढचे २ दिवस गरज वाटल्यास प्या. पण दिवसांतून एकदाच हा काढा प्यावा. पाळीमध्ये सहन न होण्यासारखं पोट दर महिन्यातच दुखत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा...