Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > पीरियड्स दरम्यान ब्रेस्ट पेन होते? असे का होते? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

पीरियड्स दरम्यान ब्रेस्ट पेन होते? असे का होते? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

Breast Pain and the Menstrual Cycle मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे आणि कंबरेत जडपणा येणे सामान्य आहे. यासह, स्तनदुखी देखील होते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 04:52 PM2023-01-20T16:52:02+5:302023-01-20T16:53:09+5:30

Breast Pain and the Menstrual Cycle मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे आणि कंबरेत जडपणा येणे सामान्य आहे. यासह, स्तनदुखी देखील होते का?

Have breast pain between periods? Why does this happen? Gynecologist says.. | पीरियड्स दरम्यान ब्रेस्ट पेन होते? असे का होते? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

पीरियड्स दरम्यान ब्रेस्ट पेन होते? असे का होते? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

मासिक पाळी दरम्यान प्रत्येक स्त्रीला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या कालावधीत पोटात क्रॅम्पिंगची समस्या अधिक जाणवते. यासह स्तनांमध्ये सूज आणि वेदना ही समस्या देखील सामान्य आहे, याला प्रीमेनस्ट्रुअल सिंड्रोम किंवा पीएमएस असे म्हणतात. ही समस्या फक्त मासिक पाळीच्या दरम्यान उद्भवते. स्तन कठोर झाल्यामुळे अनेक महिलांनाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर रजोनिवृत्तीदेखील यासाठी कारणीभूत ठरू शकते. वेदनांमुळे स्त्रियांना कधीकधी छातीत जडपणा जाणवू शकतो.

याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात

संशोधनात असे आढळून आले आहे की, मासिक पाळी दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होत असतात. हे हार्मोन्स स्तन आणि प्रजनन प्रणाली गरोदरपणासाठी तयार करतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. रितू सेठी सांगतात, "वाटर रिटेंशनमुळे स्तनांमध्ये जडपणा राहतो. ज्यामुळे स्तनांमध्ये जडपणा वाटू लागतो. मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधी शरीरातील हार्मोन्सची पातळी खूप वाढते. जेव्हा मासिक पाळी सुरू होते, तेव्हा हार्मोन्सची पातळी हळूहळू कमी होते. त्यानंतर स्तनदुखीपासून आराम मिळतो.

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी ५ टिप्स फॉलो करा

तणावापासून दूर राहा

व्यस्त दिनचर्येतील वाढता ताण दूर करण्यासाठी व्यायाम, एरोबिक्स, योगा किंवा अधिक वेळ चाला. यामुळे ताण आपोआप कमी होईल, यासह स्तनाचे दुखणे स्वतःच निघून जाईल.

आहाराची काळजी घ्या

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर रिसर्च ऑन कॅन्सरच्या मते, मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधी तळलेले आणि खारट पदार्थ खाणे टाळा. याशिवाय कॅफीनचे जास्त सेवन करणेही हानिकारक ठरू शकते. आहारात हंगामी फळे, भाज्या आणि धान्याचा समावेश करा. याने आपल्या शरीराला योग्य पौष्टिक तत्वे सहज मिळतील.

जीवनशैली बदला

वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे महत्वाचे आहे. तसेच जेवण वगळणे टाळा. ज्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीच्या चक्रावरही होतो. याशिवाय, आहारतज्ञांच्या सल्ल्याने आरोग्यदायी आहाराचे सेवन करा, त्यात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

सडपातळ रहा

जर तुम्हाला स्तनदुखीचा त्रास होत असेल तर वजनावर नियंत्रण ठेवा. डॉक्टर रीतू यांच्या मते, तुमचा लठ्ठपणा देखील स्तनाच्या दुखण्याला कारणीभूत ठरू शकते. यासाठी नियमित व्यायाम करा.

कोल्ड एंड हॉट पॅक्सचा करा वापर

स्तनांवरील वेदना कमी करण्यासाठी कोल्ड अँड हॉट पॅक्सचा वापर करा. याने स्तनांवरील वेदनेपासून आराम मिळेल.

Web Title: Have breast pain between periods? Why does this happen? Gynecologist says..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.