मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असतं. पण प्रत्येक महिलेमध्ये हे चक्र थोड्या फार फरकानं वेगवेगळं असतं . पाळी ही जर 24 ते 38 दिवसांच्या मध्ये येत असेल तर मासिक पाळी नियमित असल्याचं म्हटलं जातं. पण 38 दिवसांपेक्षा उशिरा येणारी किंवा 24 दिवसांच्या आत येणारी पाळी अनियमित समजली जाते. अनियमित पाळीमागे (irregular period) अनेक कारण्ं असतात. हार्मोनल बदलांमुळे पाळी अनियमित होते हे कारण बऱ्याच महिला आणि मुलींना माहित नसतं.
Image: Google
पाळी अनियमित असेल विशेषत: तारखेपेक्षा खूपच उशिरा येत असेल तर ती नियमित करण्यासाठी डाॅक्टर गर्भनिरोधक गोळ्या देतात. या गोळ्यांचे शरीरावर दुष्परिणाम संभवतात. अशा वेळी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा परिणाम पाळी नियमित होण्यासाठी होवू शकतो. आयुर्वेदिक तज्ज्ञ डाॅ. दीक्षा भावसार सांगतात की हार्मोनल बदलांमुळे पाळी अनियमित होते. यावर उपाय म्हणून (remedy on irregular period) आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम, योग, प्राणायाम यासोबतच ताणाचं व्यवस्थापन केल्यास, वेळेवर आणि पुरेशी झोप घेतल्यास त्याचा उपयोग पाळी नियमित होण्यासाठी होतो असं सांगतात . पण जर या उपायानेही पाळी अनियमितच येत असेल, तारखेपेक्षा खूपच उशिरा येत असल्यास डाॅ. दीक्षा भावसार हर्बल ड्रिंकचा उपाय सांगतात. हे हर्बल ड्रिंक (herbal drink on irregular period) तयार करणं फारच सोपं आहे. दीक्षा भावसार यांनी आपल्या इन्टाग्राम पोस्टवर अनियमित पाळीवर उपाय म्हणून हर्बल ड्रिंकची माहिती शेअर केली आहे.
Image: Google
तिळ-गुळाचं हर्बल पेय
तिळ गुळाचं हर्बल पेय तयार करण्यासाठी 1 मोठा चमचा तीळ, छोटा अर्धा चमचा हळद, 1 छोटा चमचा सूंठ पूड, 1 छोटा चमचा गूळ घ्यावा. तिळ गुळाचं पेय तयार करताना तिळ, हळद आणि सूंठ पावडर एकत्र करावी. एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात तिळ, हळद आणि सूंठ पावडरचं मिश्रण घालावं. हे पाणी निम्मं होईपर्यंत उकळावं. पाणी निम्मं शिल्लक राहिलं की त्यात छोटा चमचा गूळ घालावा. हे पेयं गरम असतांनाच घोट घोट प्यावं. तिळ वापरताना पांढऱ्या तिळाऐवजी काळे तिळ वापरल्यास उत्तम.
Image: Google
तिळ गुळाचं हे हर्बल पेय पाळी येण्याच्या आठ दिवस आधी प्यायला सुरुवात करावी. या पेयाचा उपयोग पाळी नियमित येण्यासाठी तर होतोच शिवाय पीसीओएस, स्थूलता, ओवेरियन/ युटेराइन सिस्ट, हायपोथायराॅइड आणि पाळीतील वेदना या स्मस्यां कमी करण्यासाठीही होतो.