Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

Using Sanitary Napkins The Right Way : The sanitary pad hack you never knew you needed : How do you use winged sanitary pads : How to put on a pad correctly with wings : सॅनिटरी नॅपकीन लावताना करा फक्त १ गोष्ट, राहाल दिवसभर कम्फर्टेबल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2024 03:48 PM2024-11-16T15:48:01+5:302024-11-16T15:57:09+5:30

Using Sanitary Napkins The Right Way : The sanitary pad hack you never knew you needed : How do you use winged sanitary pads : How to put on a pad correctly with wings : सॅनिटरी नॅपकीन लावताना करा फक्त १ गोष्ट, राहाल दिवसभर कम्फर्टेबल...

How do you use winged sanitary pads Using Sanitary Napkins The Right Way How to put on a pad correctly with wings | सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

सॅनिटरी नॅपकिन्सचे विंग्स चिटकवण्याची पाहा योग्य पद्धत, पॅड हलणार नाही-डागही पडणार नाहीत...

प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या त्या पाच दिवसांत महिलांना अनेक समस्यांचा सामान करावा लागतो. पाळी येण्याच्या आधीपासूनच आपल्याला पोटदुखी, पाय, कंबर यांचे दुखणे सुरू झालेले असते. त्यातही जास्त दगदग झाली असेल तर हे पाच दिवस आणखीनच त्रासदायक होतात. आपल्याकडे पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकीन्स वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. विविध प्रकारचे आणि ब्रँडचे सॅनिटरी नॅपकीन्स सध्या बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात. बरेचदा अशाप्रकारचे नॅपकीन वापरणे कम्फर्टेबल असल्याने गेल्या काही वर्षांपासून सर्वच वयोगटातील स्त्रिया ते वापरण्याला पसंती देतात. पॅड्सचे अनेक प्रकार असले तरीही बहुतेक (The sanitary pad hack you never knew you needed ) महिला विंग्स असणारे सॅनिटरी पॅड्स वापरण्यावर अधिक जास्त भर देतात. विंग्स असणाऱ्या सॅनिटरी पॅड्समध्ये या पॅडच्या दोन्ही बाजूला विंग्स असतात, या विंग्स आपल्या इनरवेअरला व्यवस्थित चिकटवून घेतल्यास पॅड आहे तसेच जागच्या जागी चिकटून राहते. यामुळे पॅड्स फारसे जागेवरुन हलत नाही किंवा इनरवेअरमधून सटकत नाही. विंग्स असणारे सॅनिटरी पॅड्स वापरल्याने अनेक महिलांना अधिक कम्फर्टेबल आणि बिनधास्तपणे वावरण्याचा आत्मविश्वास येतो(Using Sanitary Napkins The Right Way).

विंग्स असणारे सॅनिटरी पॅड्स वापरण्याची देखील योग्य पद्धत आहे. विंग्स अनेकदा इनरवेअरला व्यवस्थित चिटकत नाही. काहीवेळा या विंग्स आकाराने देखील लहान असतात ज्यामुळे त्या इनरवेअरवर (How to put on a pad correctly with wings) व्यवस्थित चिकटत नाही. जर हे विंग्स इनरवेअरला व्यवस्थित चिकटले नाही तर पॅड इनरवेअरवर व्यवस्थित राहत नाही. यामुळे लिकेज होऊन कपड्यांवर डाग पडण्याची शक्यता अधिक असते. प्रवासात आणि दिवसभर नोकरीच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या महिलांना ही भिती जास्त प्रमाणात सतावते. यासाठीच विंग्स असणारे सॅनिटरी पॅड वापरत असाल तर त्याचे विंग्स सॅनिटरी पॅड्सला योग्य पद्धतीने चिटकवण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How do you use winged sanitary pads).

लिकेज किंवा इनरवेअर मधून सॅनिटरी पॅड सटकू नये म्हणून ते वापरण्याची योग्य पद्धत... 

जर आपण देखील विंग्स असणारे सॅनिटरी पॅड वापरत असाल आणि त्याचे विंग्स आकाराने लहान असतील, किंवा विंग्स व्यवस्थित इनरवेअरला चिकटत नसतील तर हा एक सोपा उपाय नक्की ट्राय करुन पाहा. इनरवेअरला विंग्स असणारे सॅनिटरी पॅड्स व्यवस्थित चिटकवण्यासाठीची सोपी ट्रिक priyalsethiyaofficial या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे . 

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..


पाळीत पोट दुखतं-क्रॅम्स येतात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते ५ आसनं, त्रास कमी!

विंग्स असणारे सॅनिटरी पॅड इनरवेअरला व्यवस्थित चिकटवण्यासाठी सर्वात आधी पॅडच्या बरोबर मागच्या बाजूला मध्यभागी असणारा बटर पेपरसारखा एक पातळ कागद असतो तो अलगद काढून जिथे चिकट भाग आहे तो भाग इनरवेअरच्या बरोबर मध्यभागी लावून घ्यावा. त्यानंतर येते विंग्स लावण्याची वेळ. जर विंग्स इनरवेअरला योग्य पद्धतीने चिकटवून ठेवायचे असतील तर सर्वात आधी विंग्सवर असणारा पातळ बटर पेपरसारखा एक कागदाचा तुकडा काढून घ्यावा.

विंग्सवरील हा कागदाचा तुकडा शक्यतो आपण फेकून देतो परंतु असे न करता पॅड व्यवस्थित इनरवेअरला चिकटवण्यासाठी आपण या छोट्याशा कागदाच्या तुकड्याचा वापर करु शकतो. यासाठी इनरवेअरला मध्यभागी पॅड चिकटवून झाल्यावर इनरवेअर उलटी करावी. (पॅड चिकटवून घेतलेली बाजू खाली) त्यानंतर ज्या भागात तुम्ही इनरवेअरला विंग्स चिकटवणार असाल तेवढ्या भागात तो विंग्सवरुन काढलेला बटरपेपरसारखा पातळ कागद इनरवेअरच्या मध्यभागी ठेवून द्यावा. त्यानंतर दोन्ही विंग्स फोल्ड करुन त्या कागदावर बरोबर येतील असे चिकटवून घ्यावे. या सोप्या ट्रिकमुळे पॅडसचे विंग्स अतिशय सहज पद्धतीने इनरवेअरला चिकटून राहतील. यामुळे पॅड जागेवरुन न हलता इनरवेअरला अगदी व्यवस्थित चिकटून बसेल. यामुळे इनरवेअरमधून पॅड सटकण्याचे टेंशन राहणार नाही.

Web Title: How do you use winged sanitary pads Using Sanitary Napkins The Right Way How to put on a pad correctly with wings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.