निरोगी आरोग्यासाठी आपल्या वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. सध्या वजन वाढू नये किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण अनेक औषधे घेतो किंवा अतिप्रमाणात व्यायाम करतो.(Obesity and Menstrual Cycle) ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त वजन असणे किंवा कमी वजन असल्यामुळे आपल्या चयापचयावर परिणाम करत नाही तर तुमच्या मासिक पाळीवरही परिणाम होऊ शकतो. (Menstrual Cycle Disruptions Due to Obesity)
अनेकदा मासिक पाळी येण्यापूर्वीच किंवा आल्यानंतर महिलांच्या ओटीपोटीत दुखू लागते, वेदनेमुळे जीवही कळवळतो.(Obesity and Irregular Periods) प्रत्येक महिन्याला येणारी ही नैसर्गिक प्रक्रिया वेदनेच्या वेळी नकोशी वाटते. याकाळात पोटदुखी, पाठदुखी, वेदना होणे, रक्तस्त्राव जास्त किंवा कमी होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. (How Fat Cells Influence the Menstrual Cycle) वजन कमी किंवा जास्त झाल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी आरोग्यावर कसा परिणाम होतो जाणून घेऊया.
मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय
मासिक पाळी आणि हार्मोन्स
हार्मोन्सच्या संतुलितपणामुळे मासिक पाळी नियंत्रित राहाते. यामध्ये शरीरातील इस्ट्रोजनची पातळी संतुलित असेल तर हार्मोन्स नियंत्रित करता येते. अंडाशय हार्मोनल सिग्नलिंग सिस्टमद्वारे मेंदूशी जोडले जातात. हे मासिक पाळी नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे काम करते. यादरम्यान मेंदूचा हायपोथालेमस नावाचा महत्त्वाचा संप्रेरक तयार होतो. हे इतर संप्रेरकांच्या स्त्रावाला उत्तेजन देते जे अंडाशयांना इस्ट्रोजन तयार करण्यास आणि ओव्हुलेशन करण्यास मदत करतात. मेंदूच्या आत असलेली हायपोथालेमस ही मेंदूच्या आत असलेली रचना आहे. हे मज्जासंस्थेमधील मुख्य दुवा आहे. हार्मोन्सचा स्त्राव इस्ट्रोजनच्या पातळीवर आणि शरीरात किती ऊर्जा आहे यावर अवलंबून असतो. या दोन्ही गोष्टींचा आपल्या वजनाशी संबंध येतो. इस्ट्रोजन हे अंडाशयात तयार होते. त्यामुळे मासिक पाळीवर परिणाम होऊ शकतो.
वजन कमी झाल्यावर मासिक पाळीवर परिणाम होतो?
शरीराला ऊर्जेची गरज असते. जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता होते तेव्हा पुनरुत्पादनासारख्या अनावश्यक गोष्टी थांबतात. जर आपले वजन कमी झाले की, हे परिणाम पाहायला मिळतात. अतिप्रमाणात व्यायाम करणे, शरीराला पोषक तत्व न मिळाल्याने हायपोथालेमसवर परिणाम होतो. शरीर ओव्हुलेशनसाठी महत्त्वाच्या हार्मोन्सचे उत्पादन कमी करते. ज्याचा पाळीवर परिणाम होतो.
1. वजन कमी झाल्यामुळे पुनरुत्पादनासाठी पुरेशी ऊर्जा मिळत नाही.
2. मासिक पाळीत अनियमितात येऊ शकते. किंवा लवकर न येणे.
3. इस्ट्रोजनची पातळी कमी होणे.
4. आरोग्यावर परिणाम होऊन वंध्यत्व आणि हाडांच्या कमकुवतपणा निर्माण होऊ शकतो.