अनेक स्त्रियांना पीरियड्स दरम्यान पुरळ येतात. मांडीच्या आतील भागावर आणि नाजूक भागांवर पुळ्या, खाज येते. महिलांकडून लवकरच उपचार केला जात नाही रॅशेज वाढत जातात. अनेकदा ओलसरपणामुळे इन्फेक्शनही होऊ शकतं. इन्फेक्शनचा सामना करणं वाटंत तेव्हढं सोपं नाही, खास करून नाजूक भागांवर त्रास होत असल्यास जखम बरी व्हायला वेळ लागते.
कारण व्यवस्थित हवा लागू दिली नाही तर बरं होण्यास अनेक आठवडे लागू शकतात. हे टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. या टिप्स फॉलो केल्यानं इन्फेक्शनचा धोका कमी होऊन तुमचं शरीरही चांगलं राहिल.
स्वच्छतेची काळजी घ्या
पीरियड्स दरम्यान पॅड बदलण्यात कोणतीही वेळ वाया घालवू नका. खराब झाला असो नसो दर 6 तासांनी पॅड बदला. चांगले सॅनिटरी पॅड वापरा जे ब्लीडिंग्ज पूर्णपणे शोषून आणि बर्याच काळ टिकतात, यामुळे रक्त आजूबाजूला पसरत नाही आणि पुरळ होण्याची शक्यता कमी होत नाही. तसेच चांगल्या दर्जाचे पॅडही खरेदी करा. मोठा पॅड वापरतोय याचा अर्थ असा नाही की तो आपण दिवसभर बदलायचाच नाही. शक्यतो कॉटनचे इनरवेअर्स वापरा. त्यामुळे जास्त घाम शोषून घेता येईल आणि संक्रमण होण्याची शक्यता कमी करते.
अनेक तास असंच ठेवल्यानं त्यास भयंकर घाणेरडा वास येऊ शकतो. म्हणून वेळीच स्वच्छता राखणं गरजेचं आहे. तज्ञांच्या मते, बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. पॅड बराच वेळ असे राहिल्यास, त्यास भयानक वस येऊ शकतो. गंध आणि बॅक्टेरिया काढून टाकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे स्वच्छता राखणे.
असा करा वापर
पॅड वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. म्हणजे कुठलेही संसर्ग होणार नाहीत. अनेकदा पॅड्स रॅपरमध्ये बांधलेली असतात. एका बाजूनं रॅपर बंद केलेलं असतं. जरासं ओढलं की रॅपर उघडत आणि पॅड बाहेर काढता येतो. हेच रॅपर वापरून झालेलं पॅड फेकून देण्यासाठीही वापरता येतं. पॅड बदलताना जुनं पॅड या रॅपरमध्ये गुंडाळून मग कचऱ्यात टाकावं. पॅड काढताना पहिल्यांदा हलक्या हातानं विंग्स काढावे. त्यानंतर वरच्या बाजूनं पॅडचं टोक पकडावं आणि हलकेच दुसऱ्या बाजूपर्यंत ओढावं आणि काढावं. चुकूनही टॉयलेटमधे पॅड फ्लश करू नये.
अशी ठेवा स्वच्छता
मासिक पाळीमध्ये वजायनाच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ ठेवा. मेंस्ट्रुअल हायजीनसाठी मासिक पाळी दरम्यान वजायनाच्या आजूबाजूच्या भागात स्वच्छता राखणं गरजेचं असतं. स्वच्छता करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकता. डॉक्टराच्या सल्ल्यानं बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या वजायना क्लिनरचा उपयोग करू शकता.
पॅड्सचे प्रकार
सुपर पॅड्समध्ये चांगली शोषण क्षमता असते. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात जोरदार रक्तस्त्राव होत असेल या प्रकारच्या पॅड्सचा वापर चांगला ठरतो. नॉर्मल पॅड सामान्यत: प्रवाहासाठी कमी शोषक असतात. जास्त प्रवाह असल्यास ते वारंवार बदलण्याची आवश्यकता असू शकते. मॅक्सी पॅड्स इतर पॅड्सच्या तुलनेत मोठे असतात.
अनेक महिलांना पातळ पॅड्स वापरायला आवडतात. तुलनेनं मोठे पॅड्स जास्त सुरक्षित असतात. साधारणपणे हेवी ब्लिडिंग असल्यास या पॅड्सचा वापर होऊ शकतो. अल्ट्रा थिन पॅड्स हे इतर पॅडच्या तुलनेत बरेच पातळ, लहान आणि मॉईश्चराईज असतात. हे पॅड सामान्यत: हलक्या रक्तस्त्रावासाठी हा एक चांगला पर्याय आहे.