पिरेड्स आल्यावर आपल्याला सगळ्यात जास्त भीती असते ती ब्लडिंगचे डाग पडण्याची. पिरेड्स आल्यावर ब्लड लिकेज होऊन त्याचा कपड्यांवर डाग पडतो. असा डाग पडल्यावर चारचौघात वावरण्याची भीती आणि लाज वाटणे सहाजिकच आहे. बहुतेकवेळा चुकीच्या पद्धतीने पॅड लावल्यास, किंवा खूपवेळ पॅड बदलले नसेल तर किंवा ब्लडिंग जास्त प्रमाणात होत असेल तर कपड्यांवर ब्लडिंगचा डाग लागतो. काहीवेळा आपण रात्री झोपेत कसेही झोपतो किंवा कुठेही उठता - बसताना हे डाग खुर्ची किंवा बेडशिट्सवर लागू शकतात(How to Clean Blood Stains out of Clothes).
ब्लडिंगचे हे डाग खूपच हट्टी असतात, हे डाग जाताजात नाहीत. पिरेड्स ब्लडिंगचे डाग शक्यतो पायजमा, जीन्स, पॅन्टीज, बेडशीटवर लागतात. हे डाग घालवण्यासाठी आपण अनेकवेळा ते साबण, डिटर्जंटचा वापर करुन धुतो तरी देखील हे डाग निघत नाहीत. अनेकवेळा धुवून देखील हे डाग फिकट होतात परंतु संपूर्णपणे जात नाहीत. त्यातही जर पांढऱ्या कापडावर जर हे डाग (7 simple ways to remove period stains) पडले असतील तर ते अजूनच वाईट दिसतात. अशावेळी साबण, डिटर्जंट ऐवजी इतर काही पदार्थांचा वापर करुन आपण हे पिरेडस ब्लडिंगचे डाग अगदी सहजपणे काढू शकतो. पिरेड्स ब्लडिंगचे डाग काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आपण वापर करु शकतो ते पाहूयात(How to Remove Period Blood Stains From Cloths).
पिरेड्स ब्लडिंगचे डाग काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर करु शकतो ?
१. थंड पाण्याखाली धुवा :- पिरेड्स दरम्यान कपड्यांना लागलेले रक्ताचे डाग काढण्यासाठी आपण थंड पाण्याचा वापर करु शकतो. कपड्याच्या ज्या भागावर पिरेड्स ब्लडिंग लागले आहे तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यास हे डाग अगदी सहजपणे निघून जातात. नळाच्या वाहत्या पाण्याखाली असे रक्ताचे हट्टी डाग काढणे अतिशय सोपे जाते. जर हा डाग वाळून कोरडा झाला असेल तर असा डाग निघून जाण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो.
२. लिंबाचा रस :- पिरेड्स ब्लडिंगचे हट्टी डाग घालवण्यासाठी आपण लिंबाच्या रसाचा वापर करु शकता. लिंबाच्या रसाने कोणत्याही प्रकारचे हट्टी डाग अगदी सहजपणे काढण्यास मदत मिळते. ज्या भागावर हा डाग लागला आहे त्या भागावर लिंबाचा रस चोळून थोडा वेळ तो तसाच ठेवून द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडे स्वच्छ धुवून घ्यावे. अशाप्रकारे लिंबाचा रस वापरुन आपण हे डाग घालवू शकता.
३. साबण आणि टिश्यू पेपर :- साबण आणि टिश्यू पेपरच्या मदतीने हे डाग आपण काढू शकतो. जर आपल्याला कपडे न धुताच फक्त डाग लागलेलाच भाग स्वच्छ करायचा असेल तर आपण या ट्रिकचा वापर करु शकता. ज्या भागावर डाग लागला आहे तो भाग टिश्यू पेपर पाण्याने किंचित ओला करुन त्याने हलकेच पुसून घ्यावा. त्यानंतर कपडे धुण्याचा साबण त्यावर लावावा आणि तो भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर त्या भागावर ड्रायर फिरवावा. या ट्रिकचा वापर करुन आपण पिरेड्स ब्लडिंगचे डाग अगदी सहजपणे काढू शकता.
४. व्हाईट व्हिनेगर :- कपड्याच्या ज्या भागावर पिरेड्स ब्लडिंग लागले आहे, त्यावर थेट व्हाईट व्हिनेगर ओतावे. १० ते १५ मिनिटे ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर ब्रशच्या मदतीने हे डाग घासून घ्यावेत. सगळ्यात शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. अशाप्रकारे आपण व्हाईट व्हिनेगरचा वापर करुन पिरेड्स ब्लडिंगचे डाग घालवू शकता.
५. बेकिंग सोडा व टॅल्कम पावडर :- एका बाऊलमध्ये थोडा बेकिंग सोडा आणि टॅल्कम पावडर मिक्स करा. पेस्ट बनवण्यासाठी त्यात थोडे पाणी घाला. ही पेस्ट डाग असलेल्या भागांवर लावा आणि हलकेच घासून घ्या. त्यानंतर कापड उन्हात वाळवून घ्यावे. अशाप्रकारे आपण न धुता देखील पिरेड्स ब्लडिंगचे डाग सहजपणे काढू शकतो.
६. मीठ आणि पाणी :- कपड्यांवरील रक्ताचे डाग घालवण्यासाठी पाण्यांत मीठ मिसळून हे पाणी त्या डागांवर शिंपडून घ्यावे. त्यानंतर ब्रशच्या मदतीने हा डाग घासून नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे डाग लगेच निघतो.
७. बर्फाचा खडा :- ज्या भागावर रक्ताचे डाग पडले आहेत त्या भागावर बर्फाच्या खडा चोळल्यास डाग लगेच निघण्यास मदत होते.